म्हातारे इतुके न परी बनले फिरुनी जवान; गुडघ्यांना बाशिंग बांधुनी “मारू” राष्ट्रवादीचे मैदान!!

नाशिक :

म्हातारा इतुका न परी, बनला फिरून जवान, 

दिल्ली सोडून गल्लीचा हा झाला पंतप्रधान!!

चष्मा काळा शोभे डोळा, डोईस टक्कल छान दिल्लीहून मद्रासेला तसा करी उड्डाण!!

असे विडंबन काव्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार यांनी चक्रवर्ती राजगोपालाचारींवर लिहिले होते. ते भारताच्या गव्हर्नर जनरल पदावरून मद्रास राज्याच्या मुख्यमंत्री पदावर गेल्यामुळे आचार्य अत्रे यांनी राजगोपालाचारी यांची या विडंबन काव्यातून खिल्ली उडवली होती. NCP’s both factions are targeting each others over their old aged leaders

त्याच धर्तीवर म्हातारे इतके न परी बनले फिरून जवान गुडघ्यांना बाशिंग बांधुनी “मारू” राष्ट्रवादीचे मैदान!!, असे म्हणायचे वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी आणली आहे. कारण दोन्ही गटांचे नेते एकमेकांच्या नेत्यांची म्हातारी वये काढून एकमेकांची धुणी सार्वजनिक नळांवर धुवत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार 84 वर्षांचे म्हातारे झालेत, तरी ते निवृत्त होत नाहीत, म्हणून त्रागा चालवला आहे. शरद पवारांचे आता वय झाले त्यांनी निवृत्त होऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत जावे, असे ते प्रत्येक सभांमध्ये म्हणत आहेत. पण त्यावर पवार मी काय म्हातारा झालो का?? तुम्ही माझं काय बघितलं??, अशी अश्लील टिप्पणी करून आपले वय लपवत आहेत.

कालच ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा शरद पवारांचे म्हातारे वय काढून त्यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. शासकीय सेवेतले कर्मचारी 58 किंवा 60 व्या वर्षी निवृत्त होतात. राजकारणातले काही नेते 75 व्या वर्षी निवृत्त होतात, पण काही नेते 80 वय उलटून गेले तरी निवृत्त होत नाहीत. आता तर त्यांचे वय 84 झाले तरी ते थांबायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात पण त्यांचे कुणी आता ऐकत नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांचे वाभाडे काढले.

अजित पवारांनी शरद पवारांचे म्हातारे वय काढून वाभाडे काढल्यामुळे चिडलेल्या शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज नवी मुंबईत अजितनिष्ठ राष्ट्रवादीच्या नेत्यांची वये काढून त्यांचे वाढदिवस साजरे केले. छगन भुजबळ वय 76, हसन मुश्रीफ वय 69, दिलीप वळसे पाटील वय 67 अशी वये त्यांच्या पोस्टरवर लिहून शरदनिष्ठ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबईचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या नेत्यांचे वाढदिवस साजरे केले. हे म्हातारे नेते आता काय मॅरेथॉन धावायला जाणार आहेत का??, असा खोचक सवाल केला. हाच सवाल दोन दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिलीप वळसे पाटलांना उद्देशून केला होता.

पण या सगळ्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते हे विसरले की, आपणच आपल्या पक्षाचे आणि गटाचे नेते किती जुनाट झाले आहेत, हेच जनतेसमोर दाखवून एकमेकांची अब्रू काढतो आहोत, हेच त्यांच्या लक्षात आले नाही!!

NCP’s both factions are targeting each others over their old aged leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात