ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार बंदी घालण्याची मागणी करत आहे. मात्र, त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे हे पुस्तक इंटरेस्टिंग म्हणत आहेत.NCP MLAs, MPs are demanding ban and Supriya Sule finds the book interesting
विशेष प्रतिनिधी
मुंबई: ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑ फ द मेकिंग ऑ फ महाराष्ट्र या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर असल्याने राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार बंदी घालण्याची मागणी करत आहे.
मात्र, त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे हे पुस्तक इंटरेस्टिंग म्हणत आहेत.दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी पुस्तकावर आक्षेप घेतला असला
तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंटरेस्टिंग पुस्तक वाचत असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी तसं ट्विटच केलं आहे. त्यामुळे या पुस्तकावरून राष्ट्रवादीतच दोन मतप्रवाह असल्याचं बोललं जात आहे.
गिरीश कुबेर यांच्या रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केली आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी,
अशी मागणी करण्यात येत आहे. कुबेर यांच्या पुस्तकावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्यांसोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे?
पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा मिळतो. लेखकांचा हाच उद्देश असेल तर हे गंभीर आहे. या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करून आणि कुबेर यांना पत्र लिहून पुस्तकातील वादग्रस्त मजकूर वगळण्याची मागणी केली आहे. या पुस्तकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा आक्षेपार्ह मजकूर समाज माध्यमांद्वारे माज्या वाचनात आला.
मी अद्याप हे संपूर्ण पुस्तक वाचले नाही. तथापि या पुस्तकातील काही पाने माझ्या वाचण्यात आली आहेत. त्यामध्ये नमूद उल्लेख काळजीपूर्वक वाचला. कुबेर यांचा अर्थकारण, परराष्ट्रधोरण, विशेषत: रशियाचे राजकारण यासंबंधीचा व्यासंग पाहता त्यांनी यासंदर्भात केलेले
हे उल्लेख वाचून सखेद आश्चर्य वाटले. कुणा परदेशी लेखकाची ऐकीव माहिती किंवा मुघल इतिहासकारांनी केलेल्या उल्लेखांवर आधारित ऐतिहासिक लिखाण करणे, एकांगी व तथ्यहीन असेल ही बाब कदाचित कुबेर यांच्या लक्षात आली नसावी,
असं राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या विरोधात कटकारस्थान करणाºया कारभाऱ्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर देखील महाराणी सोयराबाई जिवंत होत्या. हे दाखवणारी अनेक साधने व पुरावे उपलब्ध आहेत.
तीच बाब बुऱ्हाणपूर मोहिमेसंदर्भात आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील स्वराज्यरक्षक संभाजी मालिका करताना मी हे पदोपदी अनुभवले आहे. त्याचप्रमाणे अशा विधानांचा आधार घेऊन भविष्यात पुन्हा बदनामीचे षडयंत्र रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
म्हणून माझी संबंधित लेखक व प्रकाशकांना विनंती आहे की, शिवशंभू प्रेमींच्या भावनांचा आदर करून आणि सत्याची कास धरून सदर आक्षेपार्ह विधाने वगळण्यात यावीत.
राष्ट्रवादीच्या खासदार आणि आमदारांनी पुस्तकावर आक्षेप घेतला असला तरी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंटरेस्टिंग पुस्तक वाचत असल्याचे म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले असून गिरीश कुबेर यांनाही टॅग केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App