सुप्रिया सुळे यांचा साताऱ्यातील पत्रकारांकडून निषेध, शरद पवार यांच्या पावसातील सभेस एकही पत्रकार उपस्थित नसल्याचा केला दावा


राज्यातील राजकारणात महत्वाच्या ठरलेल्या शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेस एकही पत्रकार उपस्थित नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या तथ्यहीन दाव्यामुळे पत्रकारांची बदनामी झाल्याने साताऱ्यातील पत्रकारांनी सुळे यांचा निषेध केला आहे.Supriya Sule protests by journalists for false claim that no journalist was present at Sharad Pawar rally


प्रतिनिधी

सातारा : राज्यातील राजकारणात महत्वाच्या ठरलेल्या शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेस एकही पत्रकार उपस्थित नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

या तथ्यहीन दाव्यामुळे पत्रकारांची बदनामी झाल्याने साताऱ्यातील पत्रकारांनी सुळे यांचा निषेध केला आहे.लोकसभा आणि विधानसभा प्रचारासाठी सातारा येथे शेवटची प्रचार सभा झाली होती.ही सभा केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने एका कॅमेऱ्याच्या सहाय्याने कव्हर केली. यावेळी कोणीही पत्रकार उपस्थित नव्हते, असे वक्तव्य सुळे यांनी केले होते. यामुळे साताऱ्यातील कर्तव्यदक्ष पत्रकारांचा अपमान झाला. या बद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सुळेंचा निषेध करण्यात आला.

सातारा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने शनिवारी जिल्हा माहिती कार्यालय आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सर्व पत्रकारांनी त्यांना अभिवादन केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

सातारा जिल्हा परिषदेच्या मैदानावर शरद पवार यांची शेवटची प्रचार सभा झाली होती. प्रचंड पावसात ही सभा पार पडली होती. मोठा पाऊस असल्याने कोणीही पत्रकार तेथे उपस्थित नव्हते.

या ठिकाणी केवळ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानेच या सभेचे शूटिंग केले. त्यानंतर ही सभा व्हायरल झाल्याचे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. या विधानावर सुळे यांनी माफी न मागितल्यास साताऱ्यातील पत्रकारांची काय ताकद आहे ते दाखवू, असा इशारा दिला

Supriya Sule protests by journalists for false claim that no journalist was present at Sharad Pawar rally

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी