
- ”जो सख्ख्या चुलत बहिणीचा राजकीय छळ करत होता…” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा, असं आव्हानही दिलं आहे.NCP MLA Jitendra Awad criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar
जितेंद्र आव्हाड म्हणतात, ”अजित पवार, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या सल्ल्याप्रमाणे आपण वागलात तर महाराष्ट्रात आपले कौतुक होईल.”
तसेच, ”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म शरद पवार यांनी दिला, त्याच पालन पोषण ही पवारांनी केलं, त्याचं संगोपन पुढे पवारांनीच केलं. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखिल पवारांमुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात. मग, जस आपण म्हटलात तस घ्याना आणि एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा.” असं आव्हान आव्हाडांनी दिलं आहे.
याशिवाय, ”जो स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी सख्या काकांचा खड्डा खणत होत. याच काकाचा वारसा हवा होता. त्या काकाला झालेल्या वेदना आणि डोळ्यातले अश्रू उभ्या महाराष्ट्रानी बघितले. जो सख्ख्या चुलत बहिणीचा राजकीय छळ करत होता तिला संपवण्यासाठी अत्यंत हीन पातळी वर जाऊन बोलत होता. स्मशानातून आवाज येतात “माझ्या खुन्याला पकडा” तू आमचा हिशोब विचारणार?” अशा शब्दांत टीका केली आहे.
याचबरोबर ”हिशोब लावून निष्ठा बदलत नाही मी, ज्यांनी दिला आसरा त्याचे घर जाळत नाही मी. लक्ष्यात आहे ना. बात करने से पेहले खुद के गिरेबान मै झाक के देखो आणि हो भगीरत बियाणीनी आत्महत्या का आणि कुणामुळे केली ? बोलता तुम्हाला येते तर मुका मी पण नाही. माझ्या मागे काकाची पुण्याई न्हाई तर गाळलेल्या घामाची ताकत आहे. ” अशा शब्दांमध्ये आव्हाडांनी अजित पवारांना लक्ष्य केले आहे.
NCP MLA Jitendra Awad criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- ‘गुड फ्रेंडस… #Melodi’, इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो केला शेअर
- सलमान खान-गिपीला स्पेनमधून देण्यात आली धमकी, VPNचा केला वापर; गँगस्टर लॉरेन्सच्या नावाने पोस्ट
- कंगना रनोत चंदीगडमधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा; अभिनेत्रीने स्वत: दिले हे स्पष्टीकरण
- बंगळुरूच्या तब्बल 48 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्व ठिकाणी एकाच वेळी पाठवले ई-मेल