नाशिक साहित्य संमेलन : अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर आणि मुख्यमंत्री ठाकरेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे गैरहजर, भुजबळांनी केले सारस्वतांचे स्वागत


आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात सुरुवात झाली आहे. दिग्गज साहित्यिक, कवी व साहित्य रसिकांच्या उपस्थितीत तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे. तथापि, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर व मुख्यमंत्री ठाकरेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. Nashik Sahitya Sammelan Updates Dr Jayant Narlikar and CM Thackeray Will Not Attend due to health problems


विशेष प्रतिनिधी

नाशिक : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशकात सुरुवात झाली आहे. दिग्गज साहित्यिक, कवी व साहित्य रसिकांच्या उपस्थितीत तीन दिवस हे संमेलन सुरू राहणार आहे. तथापि, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर व मुख्यमंत्री ठाकरेही प्रकृती अस्वास्थ्यामुळे या संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

नारळीकरांची अध्यक्षीय भाषणाची चित्रफीत

नारळीकर संमेलनात यावेत यासाठी आयोजकांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु सध्याचे हवामान व नारळीकरांची प्रकृती या पार्श्वभूमीवर नारळीकर कुटुंबीयांनी संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला. याबाबत मंगला नारळीकर माध्यमांना म्हणाल्या की, ओमिक्रॉन व्हेरिएंट, सध्याचे विचित्र हवामन व ढासळलेली तब्येत यामुळे नाशकात संमेलनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयोजकांना भाषणाची पन्नास मिनिटांची चित्रफीत पाठवली आहे. ती संमेलनात दाखवली जाईल, अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन कार्यक्रम आयोजित केल्यास आम्ही सहभागी होऊ. सूत्र प्रदान करण्यापेक्षा आमच्या वैज्ञानिक विचारांची आणि विज्ञान साहित्याची प्रेरणा वाचकांनी घ्यावी.



संमेलनाला सुरुवात

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडी मार्गस्थ झाली. आकर्षक रांगोळ्या रेखाटून नाशिककरांनी दिंडी मार्ग सजवला आहे. लेझीमचा ताल आणि ढोल ताशांच्या गजरात दिंडी निघाली. या संमेलनानिमित्त नाशिककरांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ज्ञानोबा माऊलीच्या गजरात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, हिरामण खोसकर यांनी रामकृष्ण हरीचा गाजर करत ठेका धरल्याचेही पाहायला मिळाले.

संमेलनात कोविड नियमांचे पालन

मार्गदर्शक सूचनांनुसार संमेलनातील सहभागींना मास्क घालणे बंधनकारक आहे. तापमान तपासल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Nashik Sahitya Sammelan Updates Dr Jayant Narlikar and CM Thackeray Will Not Attend due to health problems

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात