विशेष प्रतिनिधी
नाशिक : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी आपल्याला महिला पोलीस कर्मचाºयाच्या आत्महत्येच्या आरोपात गोवल्याचा आरोप नाशिकचे डीवायएसपी श्यामकुमार निपुंगे यांनी केला आहे.Nashik DYSP lodges complaint against Paramvir Singh
त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात २२ पानांची तक्रार दिली आहे. मात्र, परमवीरसिंग यांना अडकविण्याचा प्रयत्न राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार करत असल्याचा आरोप केला जात आहे.
परमवीरसिंग यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुध्द पत्र पाठविले होते. मुंबईतील बारवाल्यांकडून शंभर कोटी रुपयांचा हप्ता दरमहा गोळा करावा असे देशमुख यांनी निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याला सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला होता. यामुळे देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्याचबरोबर त्यांची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे मंत्री आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते परमवीरसिंग यांना विविध प्रकारे अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे.
श्यामकुमार निपुंगे हे राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून १९८८ रोजी पोलीस दलात भरती झाले. २०१६ रोजी भिवंडी येथील वाहतूक विभागात सहायक आयुक्त म्हणून कर्तव्यावर असताना त्यांनी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली असता परमवीरसिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली ठाणे मुख्यालयात केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
निपुंगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन आणि महिला पोलीस कर्मचारी सुभद्रा पवार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारे डॉक्टर एकच आहेत. सुभद्रा यांचा त्याच्या प्रियकराकडून खून करण्यात आला. मात्र, या खुनाला आत्महत्येचे स्वरूप देत खोटे पुरावे अन चुकीचे दोषारोपपत्र पोलीस अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त असलेले परमवीरसिंग यांच्या सांगण्यावरूनच सादर केला.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
दरम्यान, हिरेन आणि सुभद्रा या दोघांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन एकाच डॉक्टरकडून करण्यात आल्याचे निपुंगे यांचे म्हणणे आहे. सुभद्राचा खून दडपण्यात येऊन तिने गळफास घेतल्याचे भासवून आत्महत्येचे स्वरूप देत त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गेले आणि ऑन कॅमेरा झालेल्या शवविच्छेदनाच्या चित्रीकरणाची सीडीदेखील गायब करण्यात आल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे.
निपुंगे यांच्या छळाला कंटाळून सुभद्रा यांनी २०१७ साली आत्महत्या केल्याचे दाखविले गेले आणि या प्रकरणात परमवीरसिंग यांच्या सांगण्यावरून त्यांना गोवण्यात आल्याचे निपुंगे यांनी सांगितले.
खोट्या गुन्ह्यात अडकविणे, न्यायालयात खोटे पुरावे सादर करणे, मूळ गुन्हा दडवून गुन्ह्याचे स्वरूप बदलून त्यानुसार दोषारोपपत्र दाखल करणे तसेच अनुसूचित जमातीचे अधिकारी म्हणून छळ करणे असे विविध आरोप निपुंगे यांनी त्यांच्या तक्रारीत केले आहे.
यानुसार ॲट्रॉसिटी कायद्यानुसार परमवीरसिंग यांच्यासह संशयित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे निपुंगे यांनी तक्रार अर्जामध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App