नाशिकच्या ८ वर्षीय किमयाच्या “माय ओन लिटल वर्ल्ड”चे आज नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकच्या किमया या ८ वर्षीय मुलीने लिहिलेल्या आणि लहान मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणाऱ्या “माय ओन लिटल वर्ल्ड” (my own little world) या पुस्तकाचे प्रकाशन आज बुधवारी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते एका ऑनलाइन कार्यक्रमात करण्यात येणार आहे. Today Nitin Gadkari released “My Own Little World” of 8 year old Kimya from Nashik

यावेळी जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर (पुणे), प्रियदर्शनी अकादमीचे नानक रूपाणी (मुंबई), पोलीस महानिरीक्षक (आय.जी.) रवींद्र सिंघल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पुस्तकाची लेखिका किमयाच्या निमित्ताने इंग्रजी साहित्य विश्वात एका नव्या उमेदीच्या बाल साहित्यिकेची भर पडली आहे. आपल्या मनोविश्वातील विचार मंथनातून किमयाने लहान लहान सकारात्मक गोष्टींची मांडणी या पुस्तकातून केली आहे.’

चांगले सुविचार बालकथांच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याची किमयाची बाल सुलभ प्रतिभा या निमित्ताने समोर आली आहे.
किमया नाशिकच्या सुप्रसिद्ध आर्टिस्ट, आर्किटेकट शीतल सोनवणे-उगले यांची कन्या आहे. किमया इस्पॅलियर हेरिटेज स्कुलची विद्यार्थिनी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून आपल्या भावना विचार चित्रकला आणि लिखाणाच्या माध्यामातून व्यक्त करण्याचा प्रयत्न किमया करते आहे.

त्याचाच परिपाक म्हणून “माय ओन लिटल वर्ल्ड” (my own little world) तिच्या पुस्तकाची निर्मिती तिने केली आहे…  या निमित्ताने किमया महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची इंग्रजी लेखिका (बाल साहित्यिक) ठरू शकते.. तसेच, सर्वात लहान वयातील लेखिका म्हणून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये किमयाचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Today Nitin Gadkari released “My Own Little World” of 8 year old Kimya from Nashik

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*