विशेष प्रतिनिधी
वेंगुला : कोकणवरील वर्चस्व नारायण राणे यांनी पुन्हा एकदा सिध्द केले आहे. वेंगुर्ला नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीला दणका दिला आहे.Narayan Rane proves dominance over Konkan, Vengurla beats Congress-NCP-Shiv Sena alliance
भाजपच्या उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवार शितल आंगचेकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नगरसेवक विधाता सावंत यांचा 10 विरुद्ध 7 अशा मताने दणदणीत पराभव केला आहे. वेंगुल्यार्चे काँगेसचे तगडे नेते विलास गावडे यांना फार मोठा धक्का मानला जात आहे.
गावडे यांचे कट्टर समर्थक असलेले नगरसेवक विधाता सावंत यांना पक्षाने उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरले होते. यासाठी काँग्रेस पक्षाकडून गटनेते प्रकाश डिचोलकर यांनी व्हीप जारी केला होता. मात्र, काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या व सध्या भाजपमध्ये असलेल्या काही नगरसेवकांनी या व्हिप नाकारत भाजपाला मतदान केले.
मागच्या निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष राजन गिरप हे थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून गेले होते. युती असल्याने केवळ एक नगरसेवक असूनही शिवसेनेला भाजपने उपनगराध्यक्षपद दिले होते. काँग्रेसच्या तिकिटावर काँग्रेसचे सहा नगरसेवक निवडून आले होते.
नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे नगरपालिकेची राजकीय समीकरणे बदलली होती. अपक्ष म्हणून निवडून आलेले तुषार सापळे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र आजच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत तुषार सापळे तटस्थ राहिले. त्यामुळे हा एक शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App