विशेष प्रतिनिधी
पुणे : सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील या महायुतीच्या तीन उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर राहिले असताना महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांच्या सभेला शरद पवार, बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे बडे नेते हजर राहिले पण सुळे कोल्हे आणि गंगेकर यांचे अर्ज दाखल झाल्यानंतर हे शक्तिप्रदर्शन होते की कोपरा स्वभाव होती असा सवाल तयार झाला कारण या सभेला अपेक्षित गर्दी जमल्याचे चित्र दिसले नव्हते. MVA rally in pune gets poor response
महायुती आणि महाविकास आघाडी यांनी शक्ती प्रदर्शन करत पुण्यात बारामती शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापल्या जाहीर सभा घेतल्या. या जाहीर सभांमध्ये हाय प्रोफाईल सभा महायुतीचीच ठरली. कारण या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हजर राहिले. या सभेत सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची देखील भाषणे झाली.
पण त्या उलट महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण हे बडे नेते नेते हजर राहिले. मोहन जोशी, शिवसेनेकडून सुषमा अंधारे, पवारांचे समर्थक प्रशांत जगताप वगैरे नेते हजर राहिले. पण ही सभा एखाद्या कोपरा सभेसारखी झाली. कारण या सभेचे स्टेज फारच छोटे होते आणि समोर गर्दीला बसायला खुर्च्यांची देखील व्यवस्था नव्हती.
महायुतीच्या स्टेजवर सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना जागा मिळाली, पण महाविकास आघाडीच्या स्टेजवर सुप्रिया सुळे अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर या उमेदवारांना देखील जागा मिळाली नाही. ते सभेत समोर खाली जमिनीवर बसले होते. जुन्नर तालुक्यातले सत्यजित शेरकर हे आधी श्रोत्यांमध्येच बसले होते. परंतु प्रशांत जगताप यांनी त्यांना जाहीर आवाहन करत व्यासपीठावर बोलावून घेतले. महाविकास आघाडीची छोटेखानीच सभा झाली त्या तुलनेत महायुतीने मोठे शक्तिप्रदर्शन करून घेतले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App