महाविकास आघाडीत नको कोणी मोठा, नको कोणी छोटा; 12×8 चा जागावाटप फॉर्म्युला!!

MVA leadership discussions on equality in seats distribution

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित परफॉर्मन्स दिसल्यानंतर उत्साहात केलेल्या महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ??, कोण छोटा भाऊ??, कोण मधला भाऊ??, असल्या चर्चा सुरू झाल्या, पण या चर्चा आपल्या राजकीय यशाच्या मूळावर येतील हे पाहून नेत्यांनी त्या चर्चांना आवर घातला. MVA leadership discussions on equality in seats distribution

आता त्यापलीकडे जाऊन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर प्राथमिक चर्चा करायला सुरुवात केली आहे या प्राथमिक चर्चेतूनच एक नवा फॉर्मुला समोर आला आहे.

महाविकास आघाडीत नको कोणी मोठा नको कोणी छोटा; 12×8 जागा वाटपाचा फॉर्म्युला!!, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ महाराष्ट्रात 288 जागांपैकी तीन पक्षांनी प्रत्येकी 96 जागांवर निवडणूक लढवण्याचा हा फॉर्म्युला आहे. अर्थात हाच फॉर्म्युला अंतिम होईल, असे मानण्याचे कारण नाही पण लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्सच्या आधारे साधारणपणे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट यांना समसमान जागा मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री ची चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकरांनी वेगवेगळे फॉर्मुले महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिले होते त्यातला एक फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी प्रत्येक घटकाने प्रत्येकी 12 जागा लढविण्याचा होता तो फॉर्म्युला मंजूर झाला असता तर वंचित बहुजन आघाडीला 12 जागांवर निवडणूक लढण्याची संधी मिळाली असती पण काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हा फॉर्म्युला मान्य केला नाही वंचित बहुजन आघाडीला दोन-तीन जागांच्या पलीकडे जाऊन जास्त जागा देण्याची महाविकास आघाडीच्या घटक पक्ष नेत्यांची तयारी नव्हती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी बरोबर महाविकास आघाडीची युती होऊ शकली नाही.

पण आता मात्र परिस्थितीत बदल झाला असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेना तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांची ताकद वाढली. त्याचा परिणाम आता जागा वाटपाच्या चर्चेत दिसतो आहे आणि त्यातूनच मोठा भाऊ – छोटा भाऊ – मधला भाऊ असली चर्चा सुरू होऊन त्याचा दुष्परिणाम आघाडीच्या संभाव्य यशावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीतल्या काही नेत्यांनी महाविकास आघाडी छोटा भाऊ, मोठा भाऊ अशी चर्चा नको त्यापेक्षा 12×8 = 96 या फॉर्म्युला नुसार निवडणूक लढवावी, अशी चर्चा समोर आली आहे.

MVA leadership discussions on equality in seats distribution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात