विशेष प्रतिनिधी
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने २२ वर्षीय पत्नीचा धारदार कोयत्याने वार करून खून केला. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडीमध्ये ही घटना घडली. Murder of wife on suspicion of character
गौरी राहुल प्रतापे (वय 22) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी राहुल गोकुळ प्रतापे (वय २९, रा. विजय नगर, पुनावळे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचे कुटुंब मूळचे उस्मानाबाद येथील असून रोजगारासाठी ते पुण्यामध्ये आलेले आहे.
हिंजवडी परिसरातील पुनावळे भागात ते मागील दोन वर्षांपासून राहत आहेत. त्यांचे कुटुंब मजुरीची कामे करते. राहुलचा भाऊ सिक्युरिटी गार्डचे काम करतो. वडील मिळेल ते काम करतात.
मागील काही दिवसांपासून राहुल हा गौरीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरून अनेकदा त्यांची भांडणे होत होती. मंगळवारी रात्री यांच्यामध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने कोयत्याने त्याच्यावर वार करीत खून केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App