विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुफान पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचू लागले आहे. अशा भागांत उघड्या पायांनी न चालण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. साचलेल्या पाण्यात ‘लेप्टोस्पायरोसिस’चा धोका असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘लेप्टो’ हा जीवाणूजन्य रोग आहे. हा रोग प्राण्यांच्या मूत्रातून पसरतो. त्याचे संक्रमण पाण्यातून मानवी शरीरात होते. Mumbai people warn for lepto
मुसळधार पावसात शहरात विविध ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. या पाण्यातून अनेक जण चालत गेले आहेत वा काही जण अशा पाण्यात बराच वेळा उभे होते. अशा व्यक्तींनी त्यानंतर ७२ तासांत ‘लेप्टो’ प्रतिबंधक उपचारांना सुरुवात करण्याची गरज असते.
मुंबईत ‘लेप्टोस्पायरोसिस’चे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांनी तातडीने पालिका आणि खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साचलेल्या पाण्यात अधिक वेळ थांबल्यास वा त्यातून चालल्यास ‘लेप्टो’चा धोका संभवतो. ज्यांनी या काळात पाण्यातून प्रवास केला असेल त्यांनी प्रतिबंधात्मक उपचारांना सुरुवात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ताप हे ‘लेप्टो’च्या काही लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App