नीट ऐका आणि समंजसपणे बोला


अनाकलनीय संभाषण टाळून, विचारांचे आदानप्रदानाद्वारे मिळणारा निखळ आनंद अवर्णनीय असाच असतो. त्याचप्रमाणे खरं बोलावे असं नेहमीच सांगितलं जातं. अप्रिय सत्य पण न बोलणं हे जसं महत्वाचं अगदी तसंच खोटं बोलण्याचं टाळायला शिकणं हे फार महत्वाचं असतं. अनेकदा खरं बोलणं खूप ताणलं जाऊन त्याचं रुपांतर केव्हा मिथ्या गोष्टित होतं हे कळत नसतं. हे टाळता आलं पाहिजे. Listen carefully for success

खोटं बोललेलं लोकांना आवडत नसतं, अगदी आपल्याला सुद्धा. आपलं म्हणणं सुस्पष्ट पण इतराना न दुखावता मांडण्याची कला अवगत करणे सध्याच्या काळात फार गरजेचे आहे. त्यासाठी आधि समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकणे महत्वाचे असते. आपण अगम्य असं काही बोलत राहिलो तर ते लोकांना उमगत नाही. आपलं म्हणणं काय आहे त्याचं आकलन न झाल्यामुळे विनाकारण गोंधळ होऊन संबंध बिघडण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून सुस्पष्ट पण इतरांचं मन न दुखावता म्हणणं माडण्याची कला आत्मसात करणं आवश्यक असतं. मोजकं, नेमकं आणि लोकांना रुचेल असं खरं तेव्हढचं बोलायला आपण शिकलं पाहिजे.

तसेच नेहमी कृपया आणि आभारी आहे याचा संभाषणात वापर करायला शिकणं गरजेचे आहे. हे दोन शब्द म्हणजे आपल्या संभाषणातील तसंच लिखाणातील सुद्धा अत्यंत महत्वाची साधनं होत. जाणीवपुर्वक या दोन शब्दांचा आपल्या संभाषणांत वापर करायला शिकणं हे आवश्यक ठरतं. या दोन शब्दांच्या उपयोगामुळे गंभीर संभाषणही आनंदपर्यावसायी होऊ शकते. या दोन शब्दांमुळे आपला सुसंस्कृतपणा दिसून आनंदी वातावरणाची निर्मिती होते.

तसेच आपली भाषा आणि देहबोली या दोन्हीद्वारे आपल्याला मदत करण्यात आणि संरचनात्मक कार्यातच आनंद वाटतो हे दिसले पाहिजे. संभाषणादरम्यान डोळ्यास डोळा भिडवून, आत्मविश्वासाने, हसतमुखाने,किंचित करपल्लवीचा आधार घेत आणि इतरांची दखल घेत बोलण्याची कला आत्मसात करणं आवश्यक असतं. आपल्या आवाजाची पातळी शक्य तितकी खाली पण समोरच्या लोकांना ऐकू येईल इतकी उंच ठेऊन, मुद्देसूद आणि सकारात्मक ठेऊन पण आपल्याला बोलण्याची संधी दिल्यावर संभाषणाची सुरुवात करण्यास शिकणं आवश्यक असतं. सकारात्मक भाषा आणि निर्भेळ देहबोली यशाकडे नेते.

Listen carefully for success

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात