प्रतिनिधी
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खास निवासस्थान मातोश्री समोर हनुमान चालीसा वाचण्याचा आग्रह धरला. या मुद्द्यावर संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर “तोड” म्हणून आपल्या मुंबईतल्या कार्यकर्त्या फहमिदा खान यांना पुढे आणले आहे.Mumbai north east working president fahamida khan
फहमिदा खान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवले असून आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान 7 लोक कल्याण मार्ग समोर हनुमान चालीसा पठण, नमाज पठण, नवाकार मंत्रोच्चारण वगैरे सर्वधर्मीय प्रार्थना करण्याची परवानगी द्यावी. आपण तारीख आणि वेळ कळवावी त्यानुसार पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ही प्रार्थना होईल, असे या पत्रात नमूद केले आहे.
राणा दाम्पत्य अमरावतीत शिवसेनेचा पाडाव करून राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आले आहे. 2019 नंतरचे वातावरण बघून नवनीत राणा यांनी आपली भूमिका भाजपला अनुकूल केली आहे. या दाम्पत्याने शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला आहे. त्याबद्दल सध्या ते तुरुंगात आहेत.
पण त्याच वेळी राष्ट्रवादीने फहमिदा खान या मुस्लीम कार्यकर्तीला समोर करून आता केंद्रातल्या भाजपलाच ललकारले आहे. फहमिदा खान या कांदिवलीच्या रहिवासी असून त्यांच्याकडे मुंबई उत्तर पूर्व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App