मि. जरांगे, तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नॅरेटिव्हची नाही; जरांगेंनी केलेल्या शिविगाळीला प्रसाद लाडांचे उत्तर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना केलेल्या शिवीगाळीला प्रसाद लाड यांनी चपखल प्रत्युत्तर दिले आहे. मिस्टर मनोज जरांगे तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. नॅरेटिव्ह चालविण्याची नव्हे, अशा परखड शब्दांमध्ये प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्या शिवीगाळीला उत्तर दिले. Mr. Jarange, expecting justice from you

आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर कडाडून टीका केल्यावर मात्र त्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी फडणवीस यांचा बचाव केला. त्यामुळे भडकलेल्या जरांगे पाटील यांनी लाड यांना शिवीगाळ केली. अखेर या प्रकरणी आता प्रसाद लाड यांनी भाष्य केले आहे. त्यांनी X या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत जरांगे यांना सुनावले. ‘ मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या’ असे सांगत लाड यांनी जरांगे यांना सुनावले.

काय म्हटलं प्रसाद लाड यांनी ?

बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, ‘नरेटिव्ह’ची नाही! काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या.

हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार)त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले.

आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या!  असे ट्विट प्रसाद लाड यांनी केले.

काय आहे प्रकरण ?

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे यांची जीभ घसरली. जरांगे यांनी प्रसाद लाड यांच्या चोख प्रत्युत्तर दिले. मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय. डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी, असे लाड यांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना मनोज जरांगे यांनी कॅमेरासमोर प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. ‘हा कोण बांडगुळ आता? माझ्या नादाला लागू नको, तू किती पैसेवाला आणि किती करप्ट आहे. तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस. मी तुला काय म्हटलंय का? तू देवेंद्र फडणवीस यांचं पाय चाट नाहीतर काही कर, आमच्या नादी लागू नकोस. तुम्ही मोठे लोक आमच्या जातीसाठी भूषण होता, आता तुम्ही नीच निघाला’, असं जरांगे पाटील म्हणाले होते. तू भंगार नेता… तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर, अशा शेलक्या शब्दात मनोज जरांगेंनी प्रसाद लाड यांच्यावर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देताना लाड यांनी ट्विटरवरू जरांगे यांना सुनावले.

Mr. Jarange, expecting justice from you

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात