विशेष प्रतिनिधी
नागपूर : Devendra Fadnavis भारतीय जनसंघाची खरी ताकद ही भारतीय जनसंघातील मातृशक्ती होती; ज्यांनी अत्यंत खंबीरपणे भारतीय जनसंघ उभा केला. महाराष्ट्रामध्ये महिलांनी उभा केला हा भारतीय जनसंघ आहे, असे Devendra Fadnavis
गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सुमतीताई सुकळीकर जन्मशताब्दी समारोहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, माजी न्यायमूर्ती मीरा खडककर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमच्यासाठी त्या सुमतीताई या ताई नसून सुमती आत्या असल्याचे” सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, विदर्भ आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनसंघ व भाजपाच्या वाटचालीमध्ये ज्या लोकांचे नाव दीपस्तंभ म्हणून घेऊ शकतो त्यामधील सुमतीताई सुकळीकर होत्या. ज्या कालखंडामध्ये जनसंघाच्या विचारांच्या बाबतीत गैरसमज होता त्या काळामध्ये जनसंघाचे विचार घेऊन जनमाणसांमध्ये सुमतीताई सातत्याने जाऊन पक्षाचे काम करत होत्या.पक्ष मोठा झाला पाहिजे व आपल्या पक्षाचा दिवा घरोरी पोहचावा यासाठी सुमतीताई ४ वेळेस निवडणूक लढल्या. निवडणुकीमध्ये हरल्या तरी त्या मनाने कधी हरल्या नाहीत. संघर्षशील नेतृत्व म्हणून सुमतीताई यांच्याकडे बघितले जात होते.
भारतीय जनसंघाचे कुटुंब खऱ्या अर्थाने सुमतीताई यांनी उभे केले. १९६२ च्या युद्धमध्ये जेंव्हा नागपूर वरून सैन्य जात होते त्यावेळी ७००-८०० सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था सुमतीताई यांनी केली होती. राजकारणात जेंव्हा त्या वावरत होत्या त्यावेळी विरोधात लढलेल्या व्यक्तींसोबतही त्यांचा जिव्हाळा होता. सुमतीताई नानाजी देशमुख यांच्या मूल्यांवर नेहमी चालल्या. सामाजिक कार्यामध्ये देखील सुमतीताई यांनी चांगले कार्य केले. अनेक पिढ्यांना सुमतीताई यांच्या कार्याचा स्पर्श झाला असून सर्वांना मदत करणाऱ्या ताई असल्याचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुमतीताई यांच्यासाठी लोकमाता जे संबोधन वापरतात ते संबोधन अत्यंत समर्पक अशा प्रकारचे आहे. सुमतीताई यांच्यासारख्या नेत्यांनी जो पायवा रोवला, संघर्ष केला त्यामुळे आमच्या सारख्या नेत्यांना सन्मान मिळाला. आम्हाला कळसाचे काम मिळाले परंतु खऱ्या अर्थाने पाय रोवण्याचे काम ताईंनी केले. ताईंच्या परिसस्पर्शाने ज्यांचे सोने झाले अशा सर्वांचा सत्कार करण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सुमतीताई सुकळीकर यांच्या कार्याचा आढावा घेणारे ‘निष्ठा माझे नाव ताई’ पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App