MPSC Exams : एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखतीच झालेल्या नाहीत. नोकरी नसल्याने नैराश्यापोटी फुरसुंगीत तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निल लोणकर असे तरुणाचे नाव आहे. स्वप्निलने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली. ज्यात नोकरी नसल्याने आलेले नैराश्य व आर्थिक अडचणींचे कारण आहे. आता स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर आक्रोश केला आहे. Mother Angers At Govt ministers After Son commits Suicide Who Passed MPSC Exams in pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : एमपीएससीची पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षांपासून मुलाखतीच झालेल्या नाहीत. नोकरी नसल्याने नैराश्यापोटी फुरसुंगीत तरुणाने आत्महत्या केली. स्वप्निल लोणकर असे तरुणाचे नाव आहे. स्वप्निलने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली. ज्यात नोकरी नसल्याने आलेले नैराश्य व आर्थिक अडचणींचे कारण आहे. आता स्वप्नीलच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर आक्रोश केला आहे.
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. दुसरीकडे स्वप्नीलच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्वप्निलची आई म्हणाली की, ‘आज एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या केली असती तर मंत्र्याला जाग आली असती का नाही? तसंच दुसऱ्यांच्या आई-वडिलांचाही विचार करा. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल. स्वप्नील हुशार होता, त्यामुळे आम्ही त्याला शिकवलं. तो परीक्षा पासही झाला. पण मुलाखत होत नसल्याने तो आत्महत्येस प्रवृत्त झाला. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. त्याशिवाय सरकारला कळणार नाही की मुलगा जाण्याचं दु:ख काय असतं, असं म्हणत स्वप्नीलच्या आईने आक्रोश व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या की, राजकारण्यांमध्ये नुसती भांडणं सुरू आहेत. त्यांना जगात काय सुरू, काहीही माहिती नसतं. त्यांना कुणाशी काहीही देणंघेणं नाही. कोण किती झुरतंय, किती त्रासात आहे. त्यांना फक्त राजकारणाचं पडलंय. मला माहितेय माझं पोरगं किती झुरलंय ते. आई मुलाखत झाली नाही असं तो मला म्हणायचा. परीक्षा पास झालोय, पण मुलाखत अजून झाली नाही. दोन वर्ष तो खूप झुरला. यांची मुलं सुरक्षित आहेत, म्हणून यांना काही देणं-घेणं नाही. गरिबांची काय कितीही गेले तरी त्यांना फरक पडत नाही. दुसऱ्यांच्या वेदना यांना कळणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया स्वप्नीलच्या आईने दिली.
Mother Angers At Govt ministers After Son commits Suicide Who Passed MPSC Exams in pune
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App