‘पंतप्रधान महिला किसान ड्रोन सेंटर’ ही सुरू केले
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (३० नोव्हेंबर) विकास भारत संकल्प यात्रेअंतर्गत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी व्हर्चुअली संवाद साधला. Modi launched a special program to increase the number of Jan Aushadhi Kendras
याप्रसंगी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही पंतप्रधान मोदींनी सुरू केला. चांगले औषध आणि स्वस्त औषध हीच सर्वात मोठी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आता औषधांवरचा खर्च कसा कमी होत आहे, हे पंतप्रधानांनी लोकांना सांगितले.
PM Modi : संकल्प, जे छोटे ठेवायचेच नाहीत; 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीचे, समर्थ भारताच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!
लोकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, चांगली औषधे आणि स्वस्त औषधे ही मोठी सेवा आहे. जेवढी लोकं मला ऐकत आहेत, त्या सर्वांनी जनऔषधी केंद्राबद्दल इतरांना सांगण्याची मी विनंती करतो. तसेच मोदी म्हणाले की, पूर्वी 12-13 हजार रुपये औषधांवर होणारा खर्च आता जनऔषधी केंद्रामुळे केवळ 2-3 हजार रुपये होत आहे, म्हणजेच तुमच्या खिशात 10 हजार रुपये वाचत आहेत.
‘पंतप्रधान महिला किसान ड्रोन सेंटर’ सुरू केले
पंतप्रधान मोदींनी ‘पंतप्रधान महिला किसान ड्रोन सेंटर’ देखील सुरू केले आहे. ड्रोन केंद्र महिला बचत गटांना (SHGs) ड्रोन प्रदान करेल जेणेकरून ते या तंत्रज्ञानाचा वापर करून उपजीविका भागवू शकतील. या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षांत १५ हजार ड्रोन दिले जाणार आहेत. या योजनेबाबत बोलताना मोदी म्हणाले की, जेव्हा ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले तेव्हा अनेकांनी या योजनेबाबत शंका व्यक्त केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App