विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वप्न आणि संकल्प…, जे छोटे ठेवायचेच नाहीत. म्हणूनच 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचे स्वरूप राहिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालाच्या सुरुवातीला झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात लाल किल्ल्यावरून संबोधित करताना मोदींनी देशवासीयांसमोर स्वप्न आणि संकल्प छोटी ठेवलीच नाहीत. जो घाम गाळायचा, जे काम करायचे ते पुढच्या 1000 वर्षांच्या प्रगतीच्या पायाभरणीचेच असले पाहिजे, असे स्वप्न आणि संकल्प मोदींनी देशवासीयांना दिले.
पीएम मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन अनेक नवीन योजनांची घोषणा केली. अनेक नवीन आश्वासन दिली. वर्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरुन हे शेवटच संबोधन होते. या भाषणाचे अनेक राजकीय अर्थ आहेत. 2024 नंतर पुन्हा सत्तेवर येण्याचे नाहीत तर त्या पलीकडचे फार मोठ्या कालखंडाचे आहेत. या कालखंडात जे निर्णय होतील, ते पुढच्या 1000 वर्षाची दिशा निश्चित करतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more