अमोल मिटकरींना तोंडाच्या गटारावर आमदारकी,मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, मनसेनी दिली धमकी


मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिली.MNS threatens to blacken the glass of car while going to Mantralaya


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी काँग्रेसला  जबाबदार असल्याचे वक्तव्य मनसे नेते राज ठाकरे यांनी केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. या टीकेवर मनसेनेही प्रत्युत्तर दिले. मनसेचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख जगदीश खांडेकर यांनी मिटकरी यांना थेट धमकीच दिली आहे.

मंत्रालयात जाताना गाडीच्या काचा काळ्या करा, अन्यथा गाडीत दिसल्यास मिटकरींना फोडू, अशी खुली धमकी खांडेकर यांनी दिली. खांडेकर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ टाकला आहे.

महाराष्ट्रात आमदार अमोल मिटकरी हा एक बाजारू विचारवंत आहे. तोंडाच्या गटारावर आमदारकी मिळालीय. हे गटार बंद ठेवा, अन्यथा मी ज्या विधानसभा मतदारसंघाचं काम करतो तेथून मंत्रालयात गाडी घेऊन जाताना गाडीच्या काचा फोडू.



तुम्ही गाडीच्या काचा काळ्या करून जातात, आता जास्त काळ्या काचा करून जा. नाही तर दुसऱ्याची गाडी घेऊन या, नाही तर महाराष्ट्र सैनिकाला गाडीत दिसला तर फोडून काढल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी मनसे नेते खांडेकर यांनी दिली.

मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असा द्वेष निर्माण करून राष्ट्रद्रोह केल्याचा आरोप केला; पण त्यांनी राष्ट्रद्रोह म्हणजे काय हे आधी समजून घ्यावे.

एखादा व्यक्ती राष्ट्रद्रोही आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या कायद्याचे काम आहे. मग मिटकरी भारतीय संविधानापेक्षा मोठा झाला का? राज ठाकरे यांच्यावर बोलण्याएवढी मिटकरी यांची लायकी नाही, असेही खांडेकर म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे.

साधारणपणे आपण 99 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.

MNS threatens to blacken the glass of car while going to Mantralaya

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात