MNS VS SENA : नालेसफाईचं कमिशन मिळालं नाही म्हणून लांडेंना राग : मनसे


  • नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदारावर आमदार दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर कचरा टाकला

विशेष प्रतिनिधी

मुंबई: नालेसफाई न झाल्यामुळे कंत्राटदाराला रस्त्यावर बसवून त्याच्या अंगावर कचरा टाकल्यामुळे शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीपमामा लांडे चांगलेच चर्चेत आले. सोशल मीडियावर आमदार लांडेंचा हा प्रताप व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली आहे.MNS VS SENA :  Lande angry over non-receipt of cleaning commission: MNS

दिलीप लांडे पूर्वी ज्या पक्षात होते त्या मनसेनेही दिलीप लांडेंच्या या प्रतापावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे.

“गेल्या काही दिवसांपासून पालिकेचे अधिकारी, नेते, महापौर शहरात नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा करत आहेत. जर नालेसफाई झाली असेल तर मग हा गाळ आला कुठून? लांडेंचं म्हणाल तर त्यांना नालेसफाईमधलं कमिशन मिळालं नसेल म्हणून राग आला असेल.

तुम्ही सत्तेत आहात, आमदार आहात…मग वॉर्ड ऑफिसरला सांगून कंत्राटदारावर कारवाई का नाही करायला लावली? त्याऐवजी हे धंदे का करताय”, असं म्हणत मनसेच्या संदीप देशपांडेंनी दिलीप लांडेंना टोला लगावला आहे.

दरम्यान भाजप आमदार राम कदम यांनीही आमदार लांडेंवर टीका केली आहे. राम कदम यांनी ही शिवसेनेची नौटंकी असल्याचं म्हटलंय. शिवसेना महापालिकेत सत्तेत आहे. दरवर्षी नालेसफाईच्या नावावर कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जातो. आज शिवसैनिक रस्त्यावरुन येऊन कंत्राटदाराला मारहाण करत आहेत. खरी मारहाण त्यांनी नालेसफाईच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या नेत्यांना केली पाहिजे अशी प्रतिक्रीया घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी दिली आहे.

MNS VS SENA : Lande angry over non-receipt of cleaning commission: MNS

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था