इंधनाचे दर वाढलेत हे खरे पण संकटकाळात जनकल्याण कामांवर भरपूर रक्कम खर्च देखील होतेय; पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडली वस्तुस्थिती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – पेट्रोल – डिझेलच्या चढत्या दरांमुळे लोकांना त्रास होतोय ही वस्तुस्थिती आहे. पण त्याच बरोबर कोरोनाच्या या संकटकाळात जनकल्याणाच्या कामांवर सरकार भरपूर रक्कम खर्च देखील करते आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केले आहे. Rahul Gandhi must answer why fuel prices are high in Congress-ruled states like Punjab, Rajasthan, & Maharashtra

इंधन दरवाढीचा जनतेला त्रास होत असल्याची कबुली प्रधान यांनी दिली. ते म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात फक्त लसीकरणावर येत्या वर्षभरात केंद्र सरकार ३५००० कोटी रूपये खर्च करणार आहे. या खेरीज देशातील ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान पुरवठ्यावर मोठा खर्च होतो आहे. सुमारे १ लाख कोटी रूपयांची पॅकेजेस दिली गेली आहेत. यापुढे देखील विविध जनकल्याण योजनांवर सरकार खर्च करणार आहे. राज्य सरकारांचा देखील विविध योजनांवर खर्च होतो आहे.

इंधन दरवाढीवरून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी केवळ राजकीय टीका करताहेत. कारण काँग्रेसशासित राज्ये पंजाब आणि महाराष्ट्रातच इंधनाचे दर अधिक आहेत. राहुलजींना इंधनदरवाढीची एवढी चिंता असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगून महाराष्ट्रातले इंधनावरचे अधिभार आणि कर कमी करायला सांगावेत.

कारण देशामध्ये इंधनाचे सर्वांत जास्त दर हे मुंबईमध्ये आहेत आणि महाराष्ट्रात त्यांचे सरकार आहे. त्यांनी कर कमी करून महाराष्ट्राच्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी टिपण्णी धर्मेंद्र प्रधान यांनी केली.

Rahul Gandhi must answer why fuel prices are high in Congress-ruled states like Punjab, Rajasthan, & Maharashtra

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात