MLA Phuke : आमदार फुकेंचा आरोप – लक्षवेधी लावण्याची धमकी देऊन पैशांचीही मागणी; गडचिरोलीतील राईस मिल मालकांना ब्लॅकमेलचा प्रयत्न

MLA Phuke

प्रतिनिधी

मुंबई : MLA Phuke गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिलधारकरांनी चुका केल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईही झाली होती. आता तशाच कारवाया परत करण्याची धमकी त्यांना दिली जात आहे. सभागृहात लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू. तुमची राईस मिल बंद करू. तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारचे इशारे राईस मिलधारकांना दिले जात असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. इतकेच नाही तर आमदार फुके यांनी याबाबत एजंटासोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिपही विधिमंडळात सादर केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, फुकेंच्या या आरोपामागे भाजपमधील फडणवी सविरुद्ध सुधीर मुनगंटीवार असा वाद असण्याची चर्चा आहे. कारण दोन दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी विधानसभेत राईस मिल प्रकरणात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिल मालकावर कठोर कारवाईचे आश्वासनही दिले होते.MLA Phuke



फुके यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर काय होणार? असे म्हटले आहे. विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटांकडून पैशांचा व्यवहार होत असल्याचा आरोप या माध्यमातून करण्यात आला आहे. विरोधी पक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी यासाठी या ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आल्या असल्याचे आमदार फुके यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तापसणी झाल्यानंतरच पोलिस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, अशी माहिती फुके यांनी दिली.

कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरी कारवाई : मंत्री कदम

कोणत्याही राजकीय पक्षाचे नेते व एजंट असा गैरप्रकार करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कुठलीही हलगर्जी सहन करणार नाही. हे लोक कुठल्याही राजकीय पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

सभागृहात कोणाचेही नाव न घेण्याच्या सूचना

या ऑडिओ क्लिपचा अहवाल हातात येत नाही तोपर्यंत सभागृहात कोणाचेही नाव न घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार फुके यांना केली आहेत. याआधीदेखील लक्षवेधी लावण्याच्या संदर्भात पैशाची देवाणघेवाण झाली असल्याचा आरोप झाले आहेत. मात्र आता या ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपच्या नेत्यांतील वाद चव्हाट्यावर आला

सूत्रांनी सांगितले की, वरवर पाहता आमदार फुके यांनी केलेला आरोप म्हणजे राईस मिल मालकांची बाजू मांडण्याचा प्रयत्न दिसतो. मात्र, यात दोन दिवसांमधील घडामोडी पाहता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद यामुळे चव्हाट्यावर आला आहे. फडणवीसांच्या आदेशानेच फुकेंनी प्रकरण उचलले असावे.

मुनगंटीवारांनी मांडली होती लक्षवेधी

सुधीर मुनगंटीवार यांनी राईस मिल प्रकरणात लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सहभाग घेतला होता. लाच दिल्याशिवाय शेतकऱ्यांना धान्य भरडाईसाठी परवानगी दिली जात नाही, काहींचा तांदूळ उचलला जात नाही. तसेच काहींना लॉटही दिला जात नाही. असा उघडपणे भ्रष्टाचार गडचिरोलीत सुरू आहे, असा आरोप पटोले, मुनगंटीवारांनी केल्यावर अजित पवार म्हणाले होेते की, मस्तीत आलेल्यांचा कायमचा बंदोबस्त करतो.

MLA Phuke’s allegation – Threatening to attract attention and demanding money

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात