Mini lockdown in Maharashtra : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खाली दिलेले निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. Mini lockdown in Maharashtra From monday, day 144 and night curfew will be imposed in Maharashtra, find out what will be Closed
प्रतिनिधी
मुंबई : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार खाली दिलेले निर्बंध व नियम 10 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होतील, असे राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आज (9 जानेवारी, रविवार) दुपारी 12 वाजल्यापासून नवीन कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. कलम 144 (जमावबंदी) सकाळी 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत लागू आहे. म्हणजेच एका दिवसात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकाच ठिकाणी जमू शकत नाहीत.
कोरोनाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी उद्या (शनिवारी) कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला.
कोरोनाशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे आणि कठोर निर्बंधांनुसार शाळा आणि महाविद्यालये आजपासून 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. शाळेची कार्यालये सुरू ठेवण्यास परवानगी आहे. कामाशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी असेल. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, जलतरण तलाव, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स, ब्युटी पार्लर पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. किल्ले, संग्रहालये, मनोरंजन उद्याने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
pic.twitter.com/T9Osycsx3P — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022
pic.twitter.com/T9Osycsx3P
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 8, 2022
1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी. 2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.
1. महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी. 2. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी. 3. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था 4. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील. 5. कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी. 6. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
1. कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील. 2. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे. 3. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी. 4. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.
कमाल 50 व्यक्ती
कमाल 20 व्यक्ती
खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
1. विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम. 2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज. 3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम. 4. या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.
बंद राहतील.
1. 50 टक्के क्षमता 2. रोज रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहतील. 3. एकापेक्षा अधिक सुविधा असलेल्या आस्थापनांमध्ये इतर सुविधा बंद राहतील. 4. हेअर कटींग सलून्सनी कोव्हिडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन करावे तसेच केस कापणाऱ्या सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक आहे.
आधीच जाहीर केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा खालील नियमांचे पालन करून सुरू राहतील 1. प्रेक्षकांना बंदी 2. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी बायो-बबल 3. सहभागी होणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडूंसाठी भारत सरकारचे नियम लागू राहतील. 4. सर्व खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी दर तीन दिवसांनी आरटीपीसीआर/आरएटी 5. शहर किंवा जिल्हा पातळीवर खेळांच्या शिबिरांना, स्पर्धांना, कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी.
1. 50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक. 2. सर्व आगंतुक आणि कर्मचारी कोव्हिडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील, याची दक्षता घेण्यासाठी आस्थापनांनी मार्शल्स नेमावेत. 3. आरएटी चाचणीसाठी बूथ/किऑस्क 4. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल 5. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
1. 50 टक्के क्षमता. 2. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक. 3. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल 4. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील. 5. दररोज होम डिलीव्हरीला परवानगी राहील.
1. 50 टक्के क्षमता. सर्व आगंतुकांच्या माहितीसाठी अशा आस्थापनांच्या बाहेर दर्शनी ठिकाणावर एकूण क्षमता आणि सध्याची आगंतुकांची संख्या दर्शविणारा फलक लावणे बंधनकारक. 2. फक्त लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी देण्यात येईल 3. दररोज रात्री 10 ते सकाळी 8 पर्यंत बंद राहतील.
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार
कोविडरोधी दोन लशी किंवा राज्यात प्रवेश करण्याआधी 72 तासांपूर्वीपर्यंत आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल ग्राह्य धरण्यात येईल. हे हवाई, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही मार्गांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लागू राहील. प्रवास करणारे वाहनचालक, वहाक आणि अन्य सहयोगी कर्मचाऱ्यांनाही हे लागू राहील.
लसीकरण पूर्ण केलेल्या व्यक्तींकडून सुरू राहील.
पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी, नियमित वेळांनुसार
1.राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडल्या जातील. अशा परीक्षांसाठीचे प्रवेशपत्र यासाठीच्या प्रवासाची अत्यावश्यकता सिद्ध करण्यास पुरेसे असेल. 2. राज्याच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या परीक्षा, ज्यांच्यासाठीची प्रवेशपत्रे आधीच निर्गमित झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करण्यात आल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पडतील. अन्य सर्व परीक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच पार पाडल्या जातील. 3. परीक्षांचे संचालन करताना कोव्हिडरोधी नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्यासाठी निरीक्षक नेमतील.
Mini lockdown in Maharashtra From monday, day 144 and night curfew will be imposed in Maharashtra, find out what will be Closed
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App