मोठी बातमी : अलिगडमध्ये समाजकंटकांकडून हनुमंताच्या मूर्तीची विटंबना, लोकांमध्ये संतापाची लाट


उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातील पाडका गावात काही असामाजिक तत्त्वांनी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमंताची मूर्ती फोडली आहे. Defamation of Hanumantha idol by social miscreants in Aligarh, wave of anger among people


वृत्तसंस्था

अलीगड : उत्तर प्रदेशच्या अलिगड जिल्ह्यातील पाडका गावात काही असामाजिक तत्त्वांनी रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या हनुमंताची मूर्ती फोडली आहे. दै. जागरणने दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात तणाव पसरला असून लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मूर्ती तोडणाऱ्याला पकडले नाही, तर परिसरातील जनता कधीतरी रस्त्यावर येऊ शकते. घटनेची माहिती मिळताच गोधा पोलीस ठाण्याचे इंचार्ज सीताराम सरोज यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.मूर्तीच्या शेजारीच एक हातपंप आहे, तिथे दारू पिऊन मद्यपी पडला असावा. पुढे वर चढण्याच्या प्रक्रियेत मूर्ती पडून तुटली. जवळच एक रिकामे भांडे आणि दारूचे ग्लासही पडलेले होते. या मूर्तीची पाच वर्षांपूर्वी गावाचे प्रमुख दिनेश बाल्मिक यांनी प्रतिष्ठापना केली होती. मूर्तीची तोडफोड केल्याने लोकांमध्ये संतापाची लाट आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Defamation of Hanumantha idol by social miscreants in Aligarh, wave of anger among people

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी