मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीजचा परवाना केंद्र सरकारकडून पूर्ववत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतरत्न मदर तेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटीज’ या संस्थेला परदेशी देणग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.‘एफसीआरए’ परवान्यांच्या नूतनीकरणातील त्रुटींचा हवाला देऊन एक जानेवारीला हजारो संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली होती. यामुळे केंद्र सरकारवर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. मदर तेरेसांच्या संस्थेवर कारवाई करण्यात आल्याने याचे पडसाद थेट ब्रिटनच्या संसदेपर्यंत उमटले होते. Mother Teresa’s Missionaries of Charity license revoked by Central Government



परकी निधी नियमन कायद्याअंतर्गत या संस्थेची नोंदणी पूर्ववत करण्यात आली आहे. तत्पूर्वी केंद्राने १ जानेवारीला घेतलेल्या निर्णयानुसार जामिया मिलिया इस्लामिया, इंदिरा गांधी कला केंद्र, इस्लामिक कल्चरल सेंटर यासह देशातील ६ हजारांहून अधिक स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) नव वर्षात रद्द करण्यात आले होते. त्याआधी नाताळच्या दिवशी २५ डिसेंबरला मदर तेरेसा यांच्या संस्थेचा परवाना रद्द करण्यात आला होता. संबंधित संस्था विदेशातून घेतलेल्या देणग्यांचा आणि त्यांचा वापर कसा झाला? याचे तपशील देत नाहीत असे निरीक्षण केंद्राच्या पातळीवर नोंदविण्यात आले होते.

Mother Teresa’s Missionaries of Charity license revoked by Central Government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात