पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी प्रियांका गांधींना ब्रीफिंग करण्याचा संबंधच काय??


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे होत असताना पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना ते अक्षरशः वैतागले आहेत हे खरे. पण त्याहीपेक्षा पुढे जाऊन त्यांनी या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर थेट काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ब्रीफिंग केले आहे. हे वक्तव्य दुसऱ्या तिसऱ्या कोणाचे नसून खुद्द त्यांचे स्वतःचे आहे…!! What is the point of Punjab Chief Minister briefing Priyanka Gandhi about the security of the Prime Minister?

त्यांनी स्वतः एएनआय वृत्तसंस्थेला बाईट देताना प्रियांका गांधी यांना ब्रीफिंग केल्याची माहिती दिली आहे. हा नेमका काय प्रकार आहे? पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी ब्रीफिंग घेण्याचा प्रियांका गांधींना काय अधिकार आहे? त्या कोण आहेत? त्यांचा शासकीय यंत्रणेची संबंध काय?

प्रियांका गांधी या काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आहेत. उत्तर प्रदेश या राज्याची त्यांच्याकडे विशेष जबाबदारी आहे. त्या राज्यामध्ये काँग्रेसचा प्रचार करण्यामध्ये त्या आघाडीवर आहेत. पक्षीय पातळीवर हे 100% टक्के बरोबर आहे.

पण पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या पक्षीय विषयांमध्ये नसून त्यांना थेट पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत ब्रीफिंग करणे हे कोणत्या कपॅसिटी बसते? कोणत्या घटनात्मक अधिकारात किंवा कर्तव्यात बसते? याचा विचार पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केला नाही का? त्यांच्या कायदेशीर सल्लागारांनी त्यांना काही सांगितले नाही का? कशासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी प्रियांका गांधी यांना पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या विषयाबद्दल ब्रीफिंग केले?, असे एका पाठोपाठ एक गंभीर सवाल आता उपस्थित होत आहेत. “आपले टार्गेट निश्चित होते परंतु ते मिस्ड झाले”, म्हणून प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनी यांनी ब्रीफ केले का? असा सवालही सोशल मीडियावर करण्यात येतो आहे आणि यातच त्याचे गांभीर्य दडले आहे…!!

 घटनाबाह्य शक्ती केंद्राची कमाल!!

एरवी घटनाबाह्य शक्तीकेंद्र म्हणून अनेक नेत्यांचा उल्लेख केला जातो. त्यात यूपीए काळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उल्लेख केला जात असे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या “वरच्या” पदावर त्या असल्याची टीका त्यावेळी होत होती. ही टीका टाळण्यासाठी त्यावेळी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल ऍडव्हायझरी कौन्सिल नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. त्यामध्ये सोनिया गांधी यांना हवे ते नेते नियुक्त करण्यात आले आणि ही नॅशनल ऍडव्हायझरी कौन्सिल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची मार्गदर्शक झाली. परंतु तिला घटनात्मक वैधता काय होती? तर काहीही नाही. पण काहीही झाले तरी निदान ती एक विशिष्ट संस्था तरी होती.

पण प्रियांका गांधी कोण आहेत? फक्त काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस आणि त्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याकडून थेट पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी ब्रीफिंग घेतात आणि मुख्यमंत्री ही त्यांना ब्रीफ करतात. याचा अर्थ काय?, हा सवाल आता राजकीय वर्तुळात विचारला गेला आहे आणि याचे उत्तर लवकरात लवकर आणि स्पष्टपणे मिळणे अपेक्षित आहे.

What is the point of Punjab Chief Minister briefing Priyanka Gandhi about the security of the Prime Minister?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात