विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्येश्वर मंदिर येथील धाकटा शेखसल्ला दर्ग्यावरुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष पुण्यात मिलिंद एकबोटे यांच्यासह २० जणांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. Milind Ekbote and accomplices charged; Religious rift from the younger Sheikhsalla Dargah
पुण्येश्वर मंदिर येथील दर्गाच्या बांधकामाला न्यायालयाची स्थगिती आहे. तेथे काम सुरु नसताना काम सुरु असल्याचे सांगून एकबोटे व सहकाऱ्यांनी महाआरती करुन दिशाभूल केली. पत्रके वाटली. दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी 20 जणांवर गुन्हा दाखल केला.
सुनिल सदाशिव तांबट (कसबा पेठ), स्वप्नील अरुण नाईक ( गुरुवार पेठ) मुकुंंद मारुतीराव पाटोळे ( मंगळवार पेठ), मिलिंद रमाकांत एकबोटे ( रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), नंदकिशोर रमाकांत एकबोटे ( रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर), योगेश भालचंद्र वाडेकर ( शुक्रवार पेठ), कुणाल सोमेश्वर कांबळे (नवी सांगवी), रवींद्र राजेंद्र ननावरे (पर्वती दर्शन), संतोष कमलाकर अनगोळकर धनकवडी), धारुदत्त वसंत शिंदे (वय ५२), धनंजय मारुती गायकवाड (सदाशिव पेठ), प्रशांत प्रकाश कांबळे ( मंगळवार पेठ), देवीसिंग मोहनसिंग दशाना (कसबा पेठ), विकी रमेश चव्हाण (कसबा पेठ), आदित्य ज्ञानेश्वर कांबळे ( रा. कसबा पेठ), विश्वजीत ज्ञानदेव भिसे (हमालनगर, मार्केटयार्ड), आकाश प्रभाकर माने (चव्हाणनगर, पद्मावती), पार्थ जय प्रकाश पांचाळ ( रा. नर्हे), आदित्य संतोष राजपूत ( पद्मावती) आणि वैभव वाघ अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कसबा पेठेत पवळे चौकात महाशिवरात्रीला एकत्र येऊन तेथे महाआरती केली. सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली, असा आरोप केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App