अजित पवारांच्या पीएसोबत ओळख असल्याचं सांगत १० लाखाला गंडा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Saying that he has acquaintance with Ajit Pawar’s PA, 10 lakh rupees frod


विशेष प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख असल्याचे, सांगून पुण्यातील वारजे भागात राहणार्‍या एकाची १० लाख रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रविण विठ्ठल जगताप (रा. वाई सातारा) आणि एक अनोळखी अशा दोन आरोपींची नावे आहेत. प्रवीण जगताप याल अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी ५ कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करून देतो, माझी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे आरोपी जगताप आणि त्याच्या एका साथीदाराने फिर्यादी महेश पटवर्धन याला सांगितले.त्यावर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवला. त्यानंतर पटवर्धन यांनी आरोपीला १० लाख रुपये दिले. पण तो काही काम करत नाही.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर आरोपी प्रवीण जगताप याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी सांगितलं.

Saying that he has acquaintance with Ajit Pawar’s PA, 10 lakh rupees frod

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*