प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून अधून मधून मध्यवधी निवडणुकांचा सूर उमटत असतो. तसाच मध्यावधी निवडणुकांचा सूर तुरुंगातून बाहेर आलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच लावला आहे. मात्र संजय राऊत यांच्या सूरावर माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी विसंवादी सूर काढला आहे. Mid-term elections from Thackeray faction
महाराष्ट्रात जोपर्यंत 145 पेक्षा जास्त बहुमताचे सरकार आहे, तोपर्यंत मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे स्पष्ट मत अजितदादांनी आज जितेंद्र आव्हाड यांच्या समावेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे गटातून कायमच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका येऊ घातल्याचे बोलले जात असते. स्वतः उद्धव ठाकरेंनी काही पत्रकार परिषदांमध्ये मध्यावधी निवडणुकांचा सूर आळवला होता. संजय राऊत यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याची तयारी दिल्लीत सुरू असल्याचा दावा केला होता.
मात्र अजितदादा पवार यांनी संजय राऊत यांच्या या दाव्याला छेद दिला आहे. संजय राऊत यांनी कोणत्या आधारावर महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होतील असे भाकीत केले आहे?, हे मी त्यांना विचारेन. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. अनेक फोन येतील. त्यामुळे उद्या विचारणार नाही. पण नंतर त्यांना या मुद्द्यावर जरूर विचारेन, असे अजितदादा म्हणाले. त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात जोपर्यंत सरकारकडे १४५ चे बहुमत आहे तोपर्यंत मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App