WATCH : अरुण गवळींची दगडी चाळ पाडणार, त्याजागी उभे राहणार टोलेजंग टॉवर |मुंबई आणि अंडरवर्ल्ड यांचं घट्ट असं नातं राहिलेलं आहे. सध्या मुंबईत याबाबत फार चर्चा नसली किंवा अंडरवर्ल्डची तशी फारशी चलती नसली, तरी एक काळ असा होता जेव्हा मुंबई वेगवेगळ्या डॉनच्या तालावर नाचत होती. मुंबई आणि अंडरवर्ल्डशी संबंधित असंच एक नाव म्हणजे अरुण गवळी. मुंबईत एकेकाळी अरुण गवळी यांचं नाणं चालत होतं. अरुण गवळींचं नाव समोर आलं की, त्यासोबत आपसूकच त्यांच्या दगडी चाळीचा उल्लेख होतो. ही दगडी चाळ एकूणच अरुण गवळी आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. पण आता ही दगडी चाळ जमीनदोस्त होणार आहे. म्हाडा या जागेवर टोलेजंग इमारती उभारणार आहे.Mhada to build two 40 storied buildings on land of Arun Gawli Dagadi chawl
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App