कारागृहातील स्फोटाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी
अमरावती : महाराष्ट्रातील अमरावती मध्यवर्ती कारागृहात शनिवारी रात्री उशीरा भीषण स्फोट झाला. त्यामुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास कारागृहाच्या दोन बॅरेकच्या बाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला. स्फोटाच्या आवाजानंतर कारागृह प्रशासनात खळबळ उडाली असून अमरावती सीपी-डीसीपी आणि बॉम्ब निकामी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुदैवाची गोष्ट म्हणजे या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.Massive explosion outside two barracks in Amravati Central Jail police involved in investigation
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक 6 आणि 7 बाहेर देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटानंतर कारागृह परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच कारागृह अधिकारी, अमरावती पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांच्यासह बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
कारागृहातील स्फोटाच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आले आहे की, शेजारच्या महामार्गाच्या कल्व्हर्टवरून फटाका किंवा बॉम्ब बॉलद्वारे फेकण्यात आला आहे. बॉम्ब फेकणारी व्यक्ती कोण होती आणि त्यामागे त्याचा हेतू काय होता हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी कारागृहात अशाच पद्धतीने गांजा सापडला होता. तसेच जिल्हा कारागृहात प्लास्टिक बॉलच्या आकाराचा बॉम्बसदृश वस्तू सापडल्याची माहितीही समोर आली आहे. कारागृहाच्या आत प्लास्टिकच्या बॉलमध्ये फटाक्यासारख्या दोन वस्तू टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App