विशेष प्रतिनिधी
मुंबई : मारकडवाडीत EVMs विरोधात केला मोठा आरडाओरडा, पण जयंत पाटलांनी घेतला आमदाराच्या राजीनाम्याचा धसका!!, असला प्रकार आज शरद पवारांच्या हजेरीत मारकडवाडीत घडला.
त्याचे झाले असे :
EVMs विरोधातील ठिणगीचे वणव्यात रूपांतर करण्यासाठी शरद पवार मारकडवाडीत पोहोचले त्यांच्याबरोबर विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील आणि जयंत पाटील हे वरिष्ठ नेते देखील तिथे गेले होते.
या सगळ्यांसमोर जोरदार भाषण करताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याची मोठी गर्जना केली. आपण EVMs निवडून आलो म्हणून राजीनामा देऊन आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन पुन्हा निवडून येऊ, असे उत्तम जानकर म्हणाले.
भाषणबाजीसाठी असे म्हणणे ठीक होते, पण उत्तम जानकर यांनी खरंच राजीनामा दिला, तर माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. पण ती बॅलेट पेपरवर होणार नाही, तर EVMs वरच होईल. त्यामुळे उत्तम जानकर पुन्हा निवडून येण्याची कुठली गॅरंटी नाही. त्यामुळे EVMs विरोधातील आंदोलनातून फायदा तर काही होणार नाहीच, उलट तोटाच होईल. महाविकास आघाडीला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 आमदार गमवावा लागेल याची भीती जयंत पाटलांना वाटली.
त्यामुळे जयंत पाटलांनी तिथल्या जाहीर सभेतच उत्तम जानकर यांना शरद पवार यांच्यासमोरच दम भरला. तुम्ही बॅलेट पेपरवर पुन्हा निवडून यायची खात्री आहे, पण आत्ता तुम्ही राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडून आलाय, त्यामुळे माझ्या परवानगीशिवाय राजीनामा देऊ नका, असे जयंत पाटील उत्तम जानकर यांना म्हणाले. यातून आपल्याच आमदाराच्या राजीनाम्याच्या नुसत्या इशाऱ्याने जयंत पाटील किती घाबरले, हे सगळे जनतेला दिसले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App