विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्राच्या महिलांचा उदंड प्रतिसाद दिला, पण मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी तिलाच सावकारी खेळ म्हणत टीकास्त्र सोडले. Manoj jarange targets ladki behin yojana
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ राखी पौर्णिमेच्या आत मिळणार आहे. पण या योजनेबद्दल बडनेराचे आमदार रवी राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात, तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील, पण जर हे आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन”, असे रवी राणा म्हणाले होते. आता यावरुन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Arvind Kejriwal : तिहार करागृह प्रशासनाचा आरोप- अरविंद केजरीवाल विशेषाधिकारांचा गैरवापर करत आहेत!
आता समाज इतका भोळा राहिलेला नाही. पूर्वी समाज भोळा होता, अडाणी होता. सरकारने एखादी योजना दिली की त्याचा उदो उदो करायचे. मी त्या योजनेला नाव ठेवत नाही. ती योजना चांगली असेल. त्या योजनेचा लाभ नक्की घ्यावा. पण आता यावर शंका उपस्थित व्हायला लागली आहे. काल तुमच्याच एका आमदाराने या योजनेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. तुम्ही जर मतदार केलं नाही तर आम्ही पैसे परत घेऊ, असे ते म्हणाले. याचाच अर्थ तुम्ही जनतेसमोर उघडे पडले आहात. सरकारने ही योजना निवडणुकीत पैसे वाटपासाठीच सुरु केली आहे, हे यातूनच समोर येतंय. पोटातलं ओठावर येतंय, तसंच त्यांच्या तोंडातून हे वक्तव्य निघाले. त्यांना हे बोलायचे नव्हते”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
ही योजना म्हणजे सावकारी खेळ
ही योजना कशासाठी आहे, याबद्दल “सागर” बंगल्यावर बसून त्यांचं हे आधीच ठरलेलं असेल. पण काही लोकांना दम निघत नाही. ते पटकन बोलून गेले आणि महाराष्ट्रातील जनतेला याबद्दल समजले. ही योजना म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखा खेळ आहे. त्यानंतर ही योजना बंद पडणार. योजना चांगली देखील असेल. पण आता तुमचेच लोक म्हणतात की मतदान नाही केलं तर योजना मागे घेऊ. याचाच अर्थ ही योजना म्हणजे सावकारी खेळ आहे, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.
या योजनेचा लाभ घ्यायचा की नाही, हे आता तुम्ही ठरवायचे आहे. तुम्ही कितीही पैसे वाटत फिरलात तरीही तुम्हाला आरक्षण हे द्यायलाच लागणार आहे. तुम्ही कितीही पैसे वाटप केलात तरी तुम्ही पडणारच आहात, अशी टीकाही जरांगे यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App