विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाल्या नसल्या, तरी या निवडणुकीची राजकीय दिशा दिसू लागताच मराठा आंदोलन मनोज जरांगेंच्या तोंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट सगळ्यांचेच राजकीय करियर उद्ध्वस्त करण्याची भाषा आली आहे. Manoj Jarange Patil Statement Political career
मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी ती सहकार्याची भाषा स्वीकारण्याऐवजी शिंदे – फडणवीस सरकारला फटकारल्याचे दिसून आले.
मनोज जरांगे म्हणाले :
देवेंद्र फडणवीसांनी कितीही गणित करू द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार. तुम्ही मराठ्यांना मूर्ख समजता का?? मी राजकीय वाटेवर आलो, तर तुमचा खेळ खल्लास! मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उद्ध्वस्त करून टाकेन.
भारतात अशी जात नसेल ज्यांनी वर्षभर सरकारला सहकार्य केले. ती मराठा जात आहे. आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत. आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता??आणि कशाला चालवतात?? उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःलाच एक वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकत नाही.
धनगर, मुस्लिम, दलित, गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढतात. फडणीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सगळ्या विषयांची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्र्याच्या पोटात काही नाही म्हणत आहेत तर आम्ही तेच म्हणत आहोत म्हणूनच वर्षभर आम्ही सहकार्य केलं अजून किती दिवस निवडणुका तुमचा पोळा जवळ आला. त्याच्यानंतर मात्र मी नीटच करणार, सध्या कोणावर बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो.
धनगरांना आणि मुसलमानांना देखील फडणवीसांचाच अडथळा होता .शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देखील तेच अडथळा आहेत. गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत. सरपंचाचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही.
दुसऱ्याला मूर्ख समजायला लागले दोन-तीन दिवस सगळे विषय मार्गे लावा. जास्त नाटक करायचं नाहीत. प्रक्रिया चालू आहे. वाचत आहोत. हरकती आले आहेत, हे बघतो ते बघतो, केसेस पोलीस बघतात ही नाटकं करायची नाहीत. मी रस्त्यावर आलो राजकीय वाटेवर आलो तर खेळ खाल्लास तुमचा!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more