Congress : महाराष्ट्रात लाडकी बहीण योजने विरोधात काँग्रेस कोर्टात; मात्र हरियाणात 2000 रुपये भरणार लाडक्या बहिणीच्या खात्यात!!

Congress

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Congress लाडकी बहीण योजने संदर्भात काँग्रेसचा दुटप्पी व्यवहार आज संपूर्ण देशासमोर आला. महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारने लागू केलेल्या लाडकी बहीण योजने विरोधात काँग्रेस कोर्टात गेली आहे, पण हरियाणात मात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात 2000 रुपये भरायला काँग्रेस तयार झाली आहे.  congress doble game for ladki bahin yojna

काँग्रेसने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या वचननाम्यात राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा 2000 रुपये भरण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर गॅस सिलेंडर साठी दरभहा 500 रुपये देण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले. काँग्रेसने 7 सवलत योजना जाहीर करून सर्व घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. यात जुनी पेन्शन योजना लागू करणे, ज्येष्ठ व्यक्तींना 6000 रुपये पेन्शन देणे वगैरे घोषणांचा समावेश आहे.

काँग्रेसने हरियाणात जरी प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा 2000 रुपये भरण्याचे आश्वासन दिले असले, तरी याच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारने लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या विरोधात कोर्टात धाव घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुनील केदार वगैरे नेत्यांचे निवडणूक प्रतिनिधी राहिलेले अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजने विरोधात कोर्टात अर्ज दाखल केला. महाराष्ट्राची आर्थिक हालत खस्ता करणारा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे, तो रद्दबादल करावा, अशी प्रमुख मागणी घेऊन अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले. मात्र तरीदेखील शिंदे – फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजना लागू करण्यात पाऊल मागे घेतले नाही. पण या निमित्ताने काँग्रेसच्या दुटप्पी व्यवहार संपूर्ण देशासमोर आला.

Congress doble game for ladki bahin yojna

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात