विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला वेगवेगळा इंधन पुरवठा कोण करतंय??, या उघड गुपिताची महाराष्ट्रात चर्चा होत असताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी जालन्याला जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 1 ऑगस्टला जरांगेंचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त श्रीमंत कोकाटे यांनी दिल्या जरांगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. manoj jarange meets shrimant kokate
श्रीमंत कोकाटे आणि जरांगे यांच्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली. या भेटीतील मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी काही पुस्तकं श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जारांगे पाटील यांना भेट दिली. जरांगे पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत, असे श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले.
श्रीमंत कोकाटे आणि जरांगे यांच्या भेटीमुळे जरांगे यांच्या आंदोलनाला नवा वैचारिक इंधन पुरवठा झाल्याची बाब महाराष्ट्रासमोर आली.
श्रीमंत कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना भेटीतील मुद्द्यांवर भाष्य केले. मनोज जरांगे यांची भेट घ्यावी, अशी खूप दिवसापासून इच्छा होती. मात्र आंदोलनामुळे आणि त्यांच्या दौऱ्यामुळे भेट घेता आली नाही. अखेर आज त्यांची भेट घेतली. त्यांना संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली. तर इतर महापुरुषांची पुस्तके देखील भेट दिली. जरांगे यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत. त्यांना मी तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली आहे. त्यामध्ये ‘बरे झाले देवा कुणब्याच्या घरी जन्माला आलो’ हा अभंग आहे. तर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. की मी कुणब्याचा आहे. आताच्या तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत. मोरे ते मराठा असले तरी तुकाराम महाराज स्वतःचा उल्लेख कुणबी असा करतात. त्यामुळे आजचा मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा काही वेगळे नाही, हे जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे, असे कोकाटे म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्या मागणीच्या विरोधात घेतलेली भूमिका धक्कादायक आणि आश्चर्यजनक आहे. प्रकाश आंबेडकर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अभ्यास आहे. समाज जोडण्यासाठी ते भूमिका घेत असतात. मात्र अशावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानांमध्ये राजकारण पाहायला मिळतं, ते तोडण्याची कधी भूमिका घेत नाहीत. मराठा समाजापासून ओबीसीला काही धोका नाही. महात्मा फुले देखील आपल्या एका पुस्तकात सांगतात की सर्व मराठा आहेत. आपण सगळे भावंडं आहोत. त्यापासून एकमेकांना काही धोका नाही, असा दावा श्रीमंत कोकाटे यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more