विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे प्रत्यक्ष निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेत नाहीत, पण “रात्रीच्या खेळा”त मात्र ते सर्व पक्षीय नेत्यांबरोबर सहभागी होतात, हे चित्र कालही दिसून आले. मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराटीत काल उत्तर रात्री भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली. Manoj jarange meets all parties leaders only at night
मनोज जरंगे यांनी स्वतःच दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे तब्बल 800 इच्छुकांचे अर्ज आले आहेत. हे सगळे इच्छुक जरांगे यांच्या पाठिंब्याच्या बळावर विधानसभा निवडणुकीत उतरून इच्छित आहेत. परंतु, जरांगे यांनी अद्याप निवडणूक लढवायच्या निर्णय घेतलेला नाही. त्यांनी तो निर्णय वारंवार लांबणीवर टाकत नेला. लोकसभा निवडणुकीनंतर किमान चार-पाच वेळा निवडणूक लढवायची की नुसतंच भाजपच्या उमेदवारांना पाडायचं याचा निर्णय घेण्यासाठी बैठका झाल्या. परंतु त्यामध्ये जरांगे यांनी निर्णय घेतला नाही. आता 20 ऑक्टोबरला मराठा समाजाची बैठक बोलवून अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी काल सांगितले होते. Manoj jarange
पण दरम्यानच्या काळात जरांगे वेगवेगळ्या वेळी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर “रात्रीच्या खेळा”त मात्र सामील झाले. म्हणजे अनेक नेते त्यांना मध्यरात्री – उत्तर रात्रीच येऊन भेटले. त्यांना जरांगे यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. यामध्ये राजेश टोपे, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील वगैरे नेत्यांचा समावेश होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे काही काँग्रेसचे नेते देखील त्यांना भेटून गेले होते, पण या बहुतांश भेटी “रात्रीस खेळ चाले” याच धरतीवर झाल्या. Manoj jarange
जरांगे नेहमी ज्या देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट करतात, त्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील जरांगे यांनी मध्यंतरी फोनवर रात्रीच चर्चा केली होती. त्यामुळे जरांगे स्वतः निवडणूक लढवायचा निर्णय घेत नाहीत. तो प्रत्येक वेळी लांबणीवर टाकतात, पण सर्वपक्षीय नेत्यांबरोबर “रात्रीच्या खेळां”मध्ये सहभागी होतात हेच चित्र दिसून आले. Manoj jarange
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App