विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे पुन्हा दमबाजीच्या वळणावर, पण आता कुणाची बंदूक खांद्यावर??, असा सवाल विचारायची वेळ त्यांनीच आज परभणी मध्ये काही वक्तव्य करून आणली. Manoj Jarange is back on the offensive.
परभणी मध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण ते संतोष देशमुख प्रकरण इथपर्यंत सगळ्या प्रकरणांवर भाष्य केले. नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. मात्र त्यावेळी मनोज जरांगे यांनी त्यांची जुनीच दमबाजीची भाषा वापरली.
ओबीसी मधून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय तर मी राहात नाही. आता खरी मजा बघायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत दुसऱ्याच्या मागे लपत होता माझा विरोध नाही, असे म्हणत होता, पण आता दुसऱ्याच्या मागे लपता येणार नाही. आता देतोय का नाही ते बघावेच लागेल, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
त्याचवेळी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धनगर आरक्षण असे विषय सरमिसळ करून टाकले. ही सगळी आरक्षणे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्यावर लगेच शेतमालाला कसा भाव देत नाही ते बघतोच, अशी भाषा जरांगे यांनी वापरली. संतोष देशमुख प्रकरण सहजासहजी दाबता येणार नाही. मोबाईल तपासायला एवढा वेळ लागतो का??, पोलीस काय करतायेत??, कोणाच्या दबावाखाली काम करतात??, असे सवाल त्यांनी केले.
जरांगे यांच्या वक्तव्यातले संतोष देशमुख प्रकरण वगळता बाकी सगळे मुद्दे जुनेच होते. त्यांची भाषा ही जुनीच दमबाजी वळणाची होती, जी त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी वापरली होती. पण विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्या भाषेचा त्यांना कुठलाच अपेक्षित लाभ झाला नाही. त्यांनी ज्या मास्टर माईंडची बंदूक खांद्यावर घेतली होती, ती बंदूक पूर्ण निकामी झाली. तिच्यातून ना कुठल्या गोळ्या सुटल्या, ना विरोधकांचा त्या गोळ्यांनी वेध घेतला. उलट मास्टर माईंडचीच गेम उलटी पडली.
आता तर मास्टर माईंडचे उरले सुरले आमदार, म्हणजे फक्त 10 आमदार भाजप महायुतीच्या सत्तेच्या वळचणीला कसे, कुठून आणि केव्हा पळता येईल, याची वाट पाहत बसलेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी जुनी दमबाजीची भाषा वापरली असली, तरी आता ते कुणाची बंदूक खांद्यावर घेणार?? आणि कोण त्यांच्या खांद्यावर बंदूक देणार??, आणि मूळात तसे बंदूक देणारे कोणी उरलेत का??, तरीही कुणी तशी बंदूक खांद्यावर दिली तर ती चालणारी बंदूक असेल का??, हे कळीचे सवाल आहेत. पण हे सवाल जरांगेंना कोणी विचारले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची उत्तर देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App