“तुतारी” झाली “एक्स्पोज”, करेक्ट कार्यक्रमाची भीती; आमरण उपोषणाला लगेच स्थगिती!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : “तुतारी” झाली “एक्सपोज”, करेक्ट कार्यक्रमाची भीती; आमरण उपोषणाला लगेच स्थगिती!!, असे खरंच आज घडले. रायगडावर फुंकलेली “तुतारी” जालन्यामध्ये वाजली. पण ती वाजताना महाराष्ट्रात “एक्स्पोज” झाली. त्यामुळे बॅकफूटवर येण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यानुसार बॅकफूटवर जावे लागले आणि दरम्यानच्या काळात लिमिटच्या बाहेर गेल्याने करेक्ट कार्यक्रमाचा इशारा आल्यामुळे आमरण उपोषणही स्थगित करावे लागले!!, हा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा काल आणि आजचा घटनाक्रम ठरला. Manoj jarange had to come on backfoot, ends his fast

मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवराळ भाषेत टारगेट केल्यामुळे ते पूर्ण एक्स्पोज झाले. त्यातही त्यांच्या जुन्या सहकार्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुरती पोलखोल केली. नामदेवराव जाधव, अजय महाराज बारस्कर, संगीता वानखेडे, बाबूराव वाळेकर यांनी मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकमुखाने मनोज जरांगे यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले.

यातून जरांगे यांना विरोध वाढू लागला होता त्यामुळे त्यांनी काल आक्रमक होऊन पाहिले. परंतु राज्यभरातून त्यांचा सगळा प्रयत्न “बॅकफायर” झाला. भाजपचे नेते नितेश राणे आशिष शेलार यांच्यापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यापर्यंत अनेकांनी मनोज जरांगे यांच्या असभ्य आणि शिवराळ भाषेवर तितक्याच कठोरपणे टीकास्त्र सोडले. इतकेच नाही, तर दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला कोणी लिमिटच्या बाहेर गेले तर “करेक्ट कार्यक्रम” करणारच असे ते म्हणत असल्याचे त्या व्हिडिओतून ऐकू आले आणि इथेच कळ फिरली!!

आपण वेळीच माघार घेतली नाही, तर मराठा आरक्षण आंदोलन आपल्या हातातून निसटेल ही भीती वाटल्याने मनोज जरांगे मागे फिरले. आजच्या दिवसभरातल्या घटना घडामोडीनंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा अंतर्वली सराटीतल्या पत्रकार परिषदेत केली. त्यावेळी त्यांची भाषा आक्रमकच राहिली.



पण त्याआधी मनोज जरांगे यांच्या तोंडी “तुतारी” वाजते आहे, असे शरसंधान नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सोडले होते. मनोज जरांगे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे “संबंध” “एक्सपोज” झाल्यानंतर देखील प्रत्यक्ष आंदोलन स्थळी पवारांच्या पक्षाचे कुठलेच नेते फिरकले नाहीत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना आमरण उपोषण स्थगित करावे लागले आणि ते करताना त्यांनी उद्यापासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणा केली.

Manoj jarange had to come on backfoot, ends his fast

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात