विदर्भ आणि मराठवाड्यासोबत पश्चिम महाराष्ट्र पण दुष्काळमुक्त करणार – देवेंद्र फडणवीस


जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते जलपूजन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) जि. सातारा या प्रकल्पाचे जलपूजन रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आंधळी धरणातील या प्रकल्पाची होडीतून पाहणी केली. याप्रसंगी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार राहुल कुल, सरकारी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. West Maharashtra along with Vidarbha and Marathwada will be drought free Devendra Fadnavis

याप्रसंगी फडणवीस म्हणाले, ‘कित्येक दशकांपासून थेंब थेंब पाण्यासाठी तहानलेल्या भूमीत आज पाणी पोहोचले व या पाण्याचे जलपूजन कारण्याची संधी मिळाल्याचे मला समाधान आहे. या पाण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी मोठा संघर्ष केला. मुख्यमंत्री म्हणून मला संधी मिळाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील दुष्काळासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळही दूर करण्याच्या दृष्टीने काम सुरू केले. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवशी आंधळीच्या धरणात पाणी पोहोचले. हा अत्यंत चांगला योगायोग असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे.’


पुण्याला फ्युचर सिटी बनविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – देवेंद्र फडणवीस


याचबरोबर प्रकल्पातून 15,170 हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे. याचा लाभ 27 गावांना मिळणार आहे. 3.17 अब्ज घनफूट पाणी कृष्णा नदीतून उचलून खटाव आणि माण तालुक्यात आणले जात असून एकूण 27,500 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता देऊन ₹1331 कोटींची योजना मंजूर केली. गेल्या दीड वर्षात सरकारने 121 सिंचन प्रकल्पांना फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे. यातून 15 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. या योजनांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे. अशी माहितीही फडणवीसांनी दिली.

पूर्वी राज्यकर्ते लोकांना पाण्यासाठी झुंजवत ठेवत होते व निवडणुकीच्या काळात त्या मुद्द्यावरून मत मागत होते. मात्र आमचे सरकार लोकांना पाणी देते व त्यानंतर त्यांचे आशीर्वाद मागते आणि जो पाणी देतो त्यांना जनता नेहमीच आशीर्वाद देते ! अशी भावना फडणवीसांनी व्यक्त केली आहे.

West Maharashtra along with Vidarbha and Marathwada will be drought free Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात