बारस्कर, वानखेडे यांनी आरोप केले मनोज जरांगेंवर; जरांगे संतापून निघाले फडणवीसांच्या सागर बंगल्यावर!!

Barskar, Wankhede accused Manoj Jarang

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान अजय महाराज बारस्कर आणि संगीता वानखेडे यांनी आरोप केले मनोज जरांगेंवर, पण जरांगे संतापून निघाले देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर!! असे आज खरंच घडले. अंतरवाली सराटीत मनोज जरांगे अचानक स्टेजवरून उठले. फडणवीसांवर एका पाठोपाठ एक आरोप करत राहिले आणि मी चालत सागर बंगल्यावर जातो. काय बळी घ्यायचा आहे तो माझा घ्या, असे ते संतापून फडणवीस यांना उद्देशून म्हणाले. Barskar, Wankhede accused Manoj Jarang

शिंदे – फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 % आरक्षण मनोज जरांगे यांना पटले नाही. त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण हवे आहे. त्यामुळे ते अंतरवली सराटीत पुन्हा आंदोलनाला बसले आहेत. पण या आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अजय महाराज बारस्कर आणि त्यांच्या समर्थक संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनातला दुटप्पीपणा बाहेर काढणारे आरोप केले. मनोज जरांगे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अपमान केला. त्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मनोज जरांगे यांनी माफी मागितली. परंतु मनोज जरांगे यांच्या माफीतही अहंकाराचे मिश्रण होते, असा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी पुन्हा केला. त्यांनी कुठल्यातरी एका महिलेला आमदार करण्याचे आश्वासन दिल्याचाही आरोप दुसऱ्या पत्रकार परिषदेत केला. ही आरोप -‘प्रत्यारोपांची मालिका मनोज जरांगे यांनी देखील सुरू ठेवली.

दरम्यानच्या काळात संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे यांच्यावर ते शरद पवारांचे हस्तक असल्याचा आरोप केला. जरांगे यांच्या आंदोलनाचा सगळा पैसा शरद पवारच पुरवतात. मिळालेले 10 % टक्के आरक्षण ते मराठा समाजाला पचू द्यायचे नाही म्हणून पवारच जरांगेंना चिथावणी देतात, असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला.

आपल्याच आधीच्या दोन सहकाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे जरांगे अडचणीत आले आणि त्यांनी आज खवळून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांच्या तोफा डागल्या. मनोज जरांगे यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले. जरांगे यांनी फडणवीसांविषयी अरे तुरेची भाषा वापरली. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले.

हे बोलत असतानाच मनोज जरांगे अचानक जास्त खवळले. तिथे जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शांत होत नव्हते. त्यामुळे बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला.
या गोंधळातच मनोज जरांगे स्टेजवरून उठले आणि ते सरळ चालायला लागले. मी आत्ता चालत सागर बंगल्यावर येतो. तुम्हाला माझा बळी घ्यायचा तर घ्या, पण खोटे आरोप करू नका, असे म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले. पण उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती आधीच बिघडली आहे. यामुळे स्टेजवर गोंधळ निर्माण झाला. जरांगे मी मुंबईला चालत जाणार असं म्हणत जागेवरून उठले. तेव्हा उपस्थित मराठा समाजाने त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र तरीही ते खवळून बोलतच राहिले. तुमची तब्येत मराठा समाजाचे साठी महत्त्वाचे आहे तुम्ही शांत व्हा नाहीतर तुमची तब्येत जास्त बिघडेल, अशी तिथले मराठा समाजाचे बांधव वारंवार विनंती करत होते परंतु मनोज जरांगे खवळूनच बोलत राहिले.

मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावे, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी दिले. सगळ्या आरोपांमागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे हा संगीता वानखेडे यांनी केलेला आरोप मनोज जरांगे यांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे त्यांनी त्या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला मनोज जरांगे म्हणाले, “छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो.” मराठ्यांना मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे. पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचाच सुपडा साफ होईल, असा गंभीर इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

पण जरांगे यांच्या उपोषण स्थळी निर्माण झालेल्या या अवचित नाट्यामुळे मराठा आरक्षण विषयापेक्षा मनोज जरांगेंच्याच आंदोलनाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्याने शरद पवार आणि मनोज जरांगे यांचे “टार्गेट” एकच म्हणजे देवेंद्र फडणवीसच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Barskar, Wankhede accused Manoj Jarang

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात