आजच्या काळात एमएस धोनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्ती आहे. आज धोनीचे चाहते केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपणास पाहायला मिळतील.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असेल तरीही तो बर्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत असतो. Mahendra Singh Dhoni became a Punekar
विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या महेंद्रसिंग धोनी पुण्यात खरेदी केलेल्या घरावरून चर्चेमध्ये आहे. धोनीने त्याचे नवीन घर पिंपरी चिंचवड भागामध्ये विकत घेतले आहे. धोनीचे हे नवीन घर खूपच सुंदर आणि आलिशान आहे ,परंतु धोनीने अजून या घराच्या किमतीबद्दल कोणता हि खुलासा केलेला नाही.
गेल्या वर्षी धोनीने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले होते, त्यातील काही छायाचित्रे धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि आता धोनीने पुण्यात आणखी एक नवीन घर विकत घेतले आहे.
https://www.instagram.com/p/COVTWfrH74y/?utm_source=ig_web_copy_link
धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. बर्याचदा साक्षी स्वत: चे आणि तिच्या कुटूंबाची सुंदर छायाचित्रे पोस्ट करत असते. गेल्या वर्षी साक्षी धोनीने आपल्या मुंबईतील नवीन घराचे काही फोटो शेअर केले होते.
पुणे मधील धोनीचे हे नवीन घर अंडरकंस्ट्रक्शन आहे आणि लवकरच हे घर तयार होईल. जेव्हा धोनीने आपल्या करिअरची सुरूवात केली तेव्हा त्याने २००९ मध्ये तीन मजली घर विकत घेतले होते, ज्याचे नाव शौर्य असून तो या घरामध्ये ८ वर्ष राहिला होता.
आजकाल धोनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत त्याच्या रांचीच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहे आणि धोनीच्या या फार्म हाऊसचे नाव ‘कैलाशपती’ आहे आणि त्याचे फार्महाऊस संपूर्ण सात एकरात पसरलेले आहे आणि धोनीचे हे फार्महाऊस आतून खूपच सुंदर आणि विलासी दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App