राज्यसभा निवडणुकीत पराभवाचा झटका असा काही बसला आहे, की त्यामुळे महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणूकीत थंड “ताक” फुंकून पिण्याचाही धसका घेतला आहे!! आमदारांना मुक्कामाला ठेवण्याचे 5 स्टार हॉटेल देखील महाविकास आघाडीने बदलले आहे. पण तरीही आपल्याच घटक पक्षांच्या आमदारांच्या मतांची महाविकास आघाडीला खात्री नाही. हेच आघाडीतल्या नेत्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होताना दिसत आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे राज्यसभा निवडणुकीत तोंड भाजले त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी ताकही फुंकून पिणार असल्याचे सांगून टाकले आहे. Mahavikas Aghadi is also scared of “Taka” after his face was burnt in Rajya Sabha elections
महाविकास आघाडीचे अनेक पक्षांचे नेते अपक्ष आमदारांचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी आणि त्यांच्या अन्य दोन आमदारांनी विकास आघाडीला मतदान केले नाही. तरी देखील महाविकास आघाडीचे नेते विधानपरिषद निवडणुकीसाठी त्यांच्या नाकदुऱ्या काढताना दिसले आहेत.
– देवेंद्र भुयार महाजोमात
तर राज्यसभा निवडणुकीत नंतर जोमात आलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार विधान परिषद निवडणुकीत अधिक जोमात आले आहेत. या निवडणुकीत गुप्त मतदान असले तरी मी मात्र शिवसेना नेते संजय राऊत यांना दाखवूनच मतदान करणार, अशी खोचक सूचना देवेंद्र भुयार यांनी करून पुन्हा एकदा महाविकास आघाडीला टोचले आहे. राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा एखादा उमेदवार पडला तर संजय राऊत हे अपक्ष आमदारांवरच त्यांच्या पराभवाचे खापर फोडणार असतील तर त्यांना दाखवूनच मतदान करतो ना!!, असा कायदेशीर पेच देवेंद्र भुयार यांनी टाकला आहे.
– राऊतांसमोर पेच!!
वास्तविक विधान परिषद निवडणुकीत गुप्त मतदान असताना ते जर दाखवून केले तर मत बाद ठरेल, याची पूर्ण कल्पना देवेंद्र भुयार यांना आहे. तरी देखील अपक्ष आमदारांवरचे कथित बालंट टाळण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यासमोर दाखवून मतदान करण्याचा पेच टाकला आहे.
“भाजपला फोडाफोडीची चटक लागलीय. राज्यसभा निवडणुकीत तोंड भाजले त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी ताकही फुंकून पिणार” : विजय वडेट्टीवार, काँग्रेस मंत्री
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App