राज्यात मान्सून सक्रिय : आजपासून ठिकठिकाणी 4 दिवस हलका ते मुसळधार पाऊस, वाचा यादी


 

वृत्तसंस्था

मुंबई : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा वरुणराजाचे राज्यात उशिराने आगमन झाले आहे. विदर्भातील काही भाग वगळता मान्सून गुरुवारी (16 जून) राज्यातील 99 टक्के भागात दाखल झाला. आठवड्यापूर्वी मान्सूनने राज्यात प्रवेश करूनही अद्याप दमदार पाऊस झालेला नाही.Monsoon active in the state Light to torrential rain for 4 days from today

मात्र, आजपासून चार दिवस राज्यामध्ये मोसमी पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. ठिकठिकाणी हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला आहे.


विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज ; गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पाऊस पडण्याची शक्यता


 

राज्यात कोकण वगळता अन्य ठिकाणी चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. नैऋत्य मान्सून आता उत्तर अरबी समुद्राच्या आणखी काही भागामध्ये पुढे सरकला आहे. गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण मध्य प्रदेशातील काही भाग, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगडचा काही भाग, दक्षिण ओडिशा, आंध्र प्रदेशात मान्सून दाखल झाला आहे.

कुठे आहे ग्रीन अलर्ट

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

कुठे आहे ऑरेंज अलर्ट?

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

कुठे आहे यलो अलर्ट?

कोकण.

Monsoon active in the state Light to torrential rain for 4 days from today

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात