राज्यसभे प्रमाणेच विधान परिषदेही फटका; मलिक, देशमुखांवर मतदान बंदी कायम!!


प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता न आलेले आणि सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करता येणार नाही. या संदर्भात आज शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीतही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. Bombay high court dismissed petition of Nawab Malik and anil Deshmukh regarding voting for maharashtra legislative council


नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा


महाराष्ट्रात विधान परिषदेची निवडणूक 10 जागांसाठी 20 जून रोजी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. अखेर न्यायमूर्ती एन.जे. जमादार जोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून शुक्रवारी निकाल दिला. या निकालानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले असून त्यांना मोठा धक्का बसला आहे.

राज्यसभा निवडणुकीत मतदान नाकारल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिक या दोन्ही नेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने राखून ठेवलेल्या या निर्णयावर निकाल जाहीर करत या दोघांना न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. दोन्ही नेत्यांचा विधानपरिषदेसाठी मतांचा अधिकार न्यायालयाने नाकारल्याने आता महाविकास आघाडीचे दोन मते कमी होणार आहेत.

Bombay high court dismissed petition of Nawab Malik and anil Deshmukh regarding voting for maharashtra legislative council

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात