वृत्तसंस्था
सॅन होजे : व्यक्ती येतात जातात, सत्ता जाते येते पण महाराष्ट्र कायमच राहणार आहेना, मग तुम्ही त्या महाराष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे, सध्या महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केला. Maharashtra stuck in casteism, I will get it out, Raj Thackeray expresses confidence; Attended the convention of the Marathi Board in America
अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज यांनी मराठी भाषा, महाराष्ट्र यावर भरभरून मत व्यक्त केली.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा आहे. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे 2 मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि ‘मराठी’ म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
मराठी जनांना भेटता आलं- राज ठाकरे
बऱ्याच काळाने महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या मराठी जनांना भेटण्याचा योग मला या निमित्ताने आला, अनेकांशी संवाद झाला, ते महाराष्ट्राकडे कसं बघतात हे समजून घेता आलं. आज मुलाखतीच्या निमित्ताने मुलाखतकारांनी अनेक प्रश्न विचारले, प्रेक्षागृहातील उपस्थित प्रेक्षकांच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देता आली. यातून त्यांना मी एकूणच राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांकडे कसं बघतो, हे त्यांना कदाचित पुन्हा एकदा नव्याने समजलं असेल. पण माझ्या तिथे जमलेल्या मराठी जनांकडून पण काय अपेक्षा आहेत, हे देखील मी प्रांजळपणे मुलाखती दरम्यान मांडल्याची भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
जगभरात मराठी माणूस पोहोचला
राज ठाकरे म्हणाले की, आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल, तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, आणि हे करताना महाराष्ट्रात त्यांनी या राज ठाकरेला गृहीत धरलंत तरी चालेल, असेही ते आवर्जून म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App