राहुल नार्वेकर निघालेत बाळासाहेब ठाकरेंची कॉपी मारायला; डॅडींच्या गॅंग मध्ये शिरून भाजपशी “खेळायला”!!

Maharashtra speaker Rahul Narwekar creates stir in BJP, says he’s in don Arun Gawli’s gang now

विशेष प्रतिनिधी

मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निघालेत बाळासाहेब ठाकरेंची कॉपी मारायला; डॅडींच्या गॅंग मध्ये शिरून भाजपशी “खेळायला”!!, असे चित्र खुद्द राहुल नार्वेकरांच्या एका वक्तव्यामुळे निर्माण झाले आहे. राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीची आस आहे, पण त्यांनी अरुण गवळी उर्फ डॅडींच्या अखिल भारतीय सेनेच्या गॅंग मध्ये नुकतेच सामील झाल्याचे जाहीर केल्याने नार्वेकर यांची संभाव्य उमेदवारी अडचणीत आली आहे. Maharashtra speaker Rahul Narwekar creates stir in BJP, says he’s in don Arun Gawli’s gang now

– त्याचे झाले असे : 

दक्षिण मुंबईतून अजून भाजपने उमेदवार जाहीर केलेला नाही पण ती उमेदवारी आपल्यालाच मिळाली असे वाटून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचार सभा घ्यायला सुरुवात केली आहे यांनी 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला घेतलेल्या भायखळ्यातल्या हेरिटेज हॉटेलमधल्या सभेत एक वादग्रस्त विधान केले. आपण डॅडींच्या अखिल भारतीय सेनेमध्ये नुकताच नवीन मेंबर म्हणून प्रवेश केला आहे. डॅडींची कन्या गीता गवळी हिला मुंबईचे महापौर करायचे आहे, असे त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे नार्वेकर अडचणीत आले.

राहुल नार्वेकर म्हणाले :

विधानसभा अध्यक्ष आहे. माझे मला अधिकार माहिती आहेत. मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाही. तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील”, असं आश्वासन राहुल नार्वेकर यांनी या भाषणात दिले.

– बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी

आपले नाते अरुण गवळीशी जोडणारे राहुल नार्वेकर हे कमी एकमेव नेते नाही. एकेकाळी मुंबईतील बॉम्बस्फोट आणि दंगलीच्या पार्श्वभूमीवर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी देखील अरुण गवळीशी आपले नाते जोडले होते. शरद पवारांना आणि मुस्लिम नेत्यांना उद्देशून बाळासाहेबांनी, “तुमचा दाऊद, तर आमचा गवळी” असे जाहीर उदगार काढले होते. त्यानंतर अरुण गवळींनी बाळासाहेब ठाकरेंची भेट देखील घेतली होती. त्यावेळी ती प्रचंड गाजली होती, पण काही झाले तरी “ते” बाळासाहेब ठाकरे होते. ते कुणाकडे उमेदवारी मागायला गेले नव्हते. “हे” राहुल नार्वेकर आहेत. रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. भाजपने त्यांना विधानसभेचे अध्यक्ष केले आहे. त्यांना भाजप उमेदवारीची आस आहे. हा बाळासाहेब आणि राहुल नार्वेकर यांच्यातला फार मोठा फरक आहे.

दक्षिण मुंबईची जागा शिवसेना की भाजप लढणार?

महायुतीकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. अरविंद सावंत हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. त्यानंतर आता भाजप या जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु आहे. पण अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

दुसरीकडे शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मिलिंद देवरा हे सलग 10 वर्षे काँग्रेसमध्ये असताना दक्षिण मुंबईचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांचे वडीलही चार वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यादेखील नावाची जोरदार चर्चा आहे. उमेदवारीचा अद्याप अधिकृत असा निर्णय झालेला नाही. पण त्याआधीच राहुल नार्वेकर यांनी प्रचार सुरु केला आणि त्यांनी अरुण गवळींना प्रचारात ओढून स्वतःचीच अडचण करून घेतली.

Maharashtra speaker Rahul Narwekar creates stir in BJP, says he’s in don Arun Gawli’s gang now

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात