नटी, नाची, डान्सर, दिल्लीचा दरबार; हा लोकशाही निवडणुकांचा खेळ की सरंजामी अजब कारभार??


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नटी, नाची, डान्सर, दिल्लीचा दरबार या शब्दांचे खेळ चालू असल्याने हा लोकशाहीतला निवडणुकांचा खेळ आहे की सरंजामी अजब कारभार आहे??, असा सवाल तयार झाला आहे. Campaign trail deteriorates, as leaders showed no restraint

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक बड्या नेत्यांच्या जिभा सैलावल्या आहेत. आपण काय बोलतो??, कुणासमोर बोलतो?? सभ्यतेला धरून बोलतो का??, याचे भानच नेतेमंडळी विसरली आहेत, मग उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बटनं दाबा कचाकचा हे वक्तव्य असो किंवा संजय राऊत यांचे नटी, नाची, डान्सर हे शब्द असोत. या नेत्यांच्या जिभा घसरल्याचे निदर्शक आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर मध्ये व्यापारी आणि वकिलांच्या मेळाव्यात बोलताना अजितदादांनी घड्याळासमोरची बटनं दाबा कचाकचा, नाहीतर निधी देताना हात आखडता होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. आता या बटनं दाबा कचाकचा या वक्तव्याबद्दल अजित पवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.तिकडे अमरावतीत पोहोचलेल्या संजय राऊत यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बद्दल नटी, नाची, डान्सर, ती तुम्हाला खुणावेल, रात्रीस खेळ चाले, त्यामुळे तुम्ही सावध राहा तिच्याकडे जाऊ नका, असे असभ्य उद्गार काढले. त्यावरून संजय राऊत सोशल मीडियात ट्रोल झाले पण आज तर त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. आम्ही गणपत पाटलांना देखील प्रेमाने नाच्या म्हणायचो. आता नवनीत राणा जर नटी असतील, तर त्यांना नटी म्हणले तर का राग यावा??, असा उलटा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर नवनीत राणांचे पती आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच दिल्ली जाऊन 10 जनपथ मधल्या दरबारात नाचतात. त्यामुळे त्यांना सगळीकडे नटी, नाच्या हेच दिसणार, असे प्रत्युत्तर दिले.

एकूण लोकसभा निवडणुकीमध्ये सभ्य भाषेत आपली बाजू मांडून तितक्याच सभ्य भाषेत विरोधकांवर टीका करणे हे जवळपास दुरापास्त होत चालले आहे. कारण आपल्या नेत्यांकडे तेवढे शब्द भांडारच उरले नसल्याचे ते निदर्शक आहे. त्यामुळे असभ्य, अश्लील अशा शब्दांची भरमार त्यांच्या प्रचारातून सुरू आहे.

Campaign trail deteriorates, as leaders showed no restraint

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात