महाराष्ट्रातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री शिंदेंनी केली भावनिक पोस्ट, म्हणाले…

आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे, असंही म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवर एका पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे भक्कम पाठबळ लाभल्याचा आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व अजित पवारांची साथ मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला आहे.Maharashtra Chief Minister Shinde made an emotional post on the completion of two years of the Mahayuti government



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे, ‘विचार, विकास आणि विश्वास ! सस्नेह जय महाराष्ट्र… राज्यात सत्तेवर आलेल्या सामान्यांच्या सरकारला आज दोन वर्षे होत आहेत. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, राज्याच्या विकासाचा ध्यास आणि सामान्यांचा विश्वास यांच्या बळावर महायुती सरकारने दोन वर्षांची यशस्वी वाटचाल केली आहे. या दोन वर्षांच्या काळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांचे भक्कम पाठबळ लाभले. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि सर्व सहकाऱ्यांची समर्थ साथ लाभली. ‘

‘राज्यातील जनतेनं दिलेलं प्रेम, शिवसैनिकांची साथ आणि महायुतीमधील पक्षांचा उत्तम समन्वय यामुळे लोकहिताची शेकडो कामे मार्गी लागली. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ आणि युवकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू उमटवता आले. आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यातील जनतेनेही विश्वासाची मोहर उमटवत साथ दिली, याचा अभिमान आहे आणि त्यातून निर्माण झालेल्या जबाबदारीचे भानही आहे.’

‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संस्कारामुळेच घडू शकले. हेच विचार आणि संस्कार घेऊन पुढील वाटचाल करायची आहे. विकास साधायचा आहे आणि विश्वास वृद्धिंगत करायचा आहे. गेल्या दोन वर्षांत पाठीशी ठाम उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे ऋण व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही. प्रत्येक घटकाचे अंतःकरणापासून आभार. जय हिंद. जय महाराष्ट्र…’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Maharashtra Chief Minister Shinde made an emotional post on the completion of two years of the Mahayuti government

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात